Maharashtra Politics : ‘हे’ 2 नेते ठरवणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री; भाजपने केली अधिकृत घोषणा

मुंबई : राज्याच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला केंद्रीय नेतृत्वाकडून ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. मात्र त्यांच्या नावाची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत गटनेत्याची निवड केल्यानंतर त्याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
भाजपकडून ‘या’ 2 नेत्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती
मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर करण्यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण या दोघांची महाराष्ट्राचे निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या दोघांच्या निरीक्षणाखाली महाराष्ट्र भाजपच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड करण्यात येणार आहे.
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून नवीन सरकारमध्ये सहभागी होणार का? हा प्रश्नही अद्याप निकाली निघालेला नाही. मंत्रिमंडळातील समावेशावरूनही अजून चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागूनही भाजप मुख्यमंत्रिपदाचे नाव अधिकृतरित्या जाहीर का करीत नाही, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यावर विधिमंडळ पक्ष बैठकीत ज्याची नेता म्हणून निवड होईल, तोच मुख्यमंत्री होईल, असे भाजपकडून सांगण्यात आले आहे.





