Vijay Hazare Trophy 2021: सकारात्मक मानसिकतेमुळेच विजेतेपद – पोवार
Updated On:

मुंबई – ड्रेसिंग रुममध्ये वरिष्ठ व नवोदित खेळाडूंमध्ये अत्यंत सकारात्मक वातावरण होते त्यामुळेच खेळाडूंनी सांघिक खेळ करत विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मिळाले, असे मत मुंबईचे प्रशिक्षक रमेश पोवार यांनी दिले आहे.
मुंबईने उत्तर प्रदेशवर सहा गडी राखून मात करत चौथ्यांदा विजय हजारे करंडक पटकावला. संघातील सर्व 22 खेळाडूंना त्यांचा दर्जा आणि संघातील भूमिका याचे आकलन झाले व त्यामुळेच हे विजेतेपद मिळाले. श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, शार्दूल ठाकूर, पृथ्वी शॉ आणि धवल कुलकर्णी यांच्या योगदानामुळे तसेच संघातील सकारात्मक उर्जेमुळे मुंबईला विजेतेपदापर्यंत मजल मारता आली. अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत पृथ्वीने मोलाची कामगिरी केली, असेही पोवार म्हणाले.





