Vijay Deverakonda । विजय देवरकोंडाची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल

Vijay Deverakonda । दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाची तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही माहिती समोर येताच चाहत्यांनी त्याच्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, विजय देवरकोंडाला डेंग्यू झाला आहे. तो सध्या रुग्णालयात दाखल असून उपचार घेत आहे. यावेळी त्याचे कुटुंब त्याच्यासोबत आहे. चाहते तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत. याशिवाय विजय देवरकोंडाला 20 जुलैपर्यंत डिस्चार्ज मिळू शकतो असेही म्हंटले जात आहे.
विजय देवरकोंडा सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘किंगडम’मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात विजय देवरकोंडा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘किंगडम’ चित्रपट 31 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘किंगडम’ हा स्पाय थ्रिलर चित्रपट असेल. विजय देवरकोंडाचा हा बहुचर्चित चित्रपट तमिळ, हिंदी आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन गौतम तिन्नानुरी यांनी केले आहे. या चित्रपटात विजय देवरकोंडासोबत अभिनेत्री भाग्यश्री बोरसे स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटासाठी चाहते उत्सुक आहेत. मात्र ‘किंगडम’च्या रिलीज पूर्वी विजय देवरकोंडाची तब्येत बिघडली आहे.
हेही वाचा :
‘भारत-पाक युद्धात पाच विमाने पाडली गेली’; डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा





