विजय देवरकोंडा विरोधात एफआयआर दाखल; नेमकं काय घडलं?

Vijay Devarakonda | दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडावर एका वादग्रस्त वक्तव्यामुळे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. विजय देवरकोंडा विरुद्ध 17 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबराबादमधील रायडुर्गम पोलिसांनी विजयविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दरम्यान, विजयने आपल्या विधानाबद्दल माफीही मागितली आहे.
अलिकडेच अभिनेता सूर्याच्या ‘रेट्रो’ चित्रपटाच्या प्रमोशनला गेला होता. तेव्हा विजयवर हैदराबादमधील आदिवासी समुदायाबद्दल टिप्पणी केल्याचा आरोप झाला. आदिवासी समुदायांच्या संयुक्त कृती समितीचे राज्य अध्यक्ष नेनावथ अशोक कुमार नाईक यांनी विजय देवरकोंडा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विजयवर आदिवासींची दहशतवाद्यांशी तुलना केल्याचा आरोप केला आहे. आदिवासी समुदायाच्या भावना दुखावल्यामुळे विजय देवरकोंडा विरुद्ध एससी/एसटी कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आले आहे.
विजय देवरकोंडाचे विधान
अलिकडेच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर अभिनेता विजय देवरकोंडा कार्यक्रमात म्हणाला की, “काश्मीरमध्ये जे काही घडत आहे त्याला थांबवण्यासाठी दहशतवाद्यांना शिक्षित करा. त्यांचे इतरांकडून ब्रेनवॉश होणार नाही याची काळजी घ्या. भारताला पाकिस्तानवर हल्ला करण्याची गरज नाही कारण पाकिस्तानी लोक स्वतःच्या सरकारला कंटाळले आहेत. त्यामुळे तेच त्यांच्यावर हल्ला करतील. ते आदिवासी लोकांसारखे वागत आहेत. जसे ते 500 वर्षांपूर्वी विचार न करता भांडत होते.” Vijay Devarakonda |
To my dear brothers ❤️ pic.twitter.com/QBGQGOjJBL
— Vijay Deverakonda (@TheDeverakonda) May 3, 2025
विजय देवरकोंडाने मागितली माफी
विजय देवरकोंडाने या वादावर माफी मागत लिहिले की, “रेट्रोच्या ऑडिओ लाँच कार्यक्रमामध्ये मी केलेल्या विधानामुळे काही लोक माझ्यावर नाराज झाले आहेत. मी प्रामाणिकपणे स्पष्ट करू इच्छितो की माझा कोणत्याही समुदायाला दुखावण्याचा किंवा लक्ष्य करण्याचा हेतू नव्हता, विशेषतः आपल्या अनुसूचित जमातींना, ज्यांचा मी खूप आदर करतो आणि ज्यांना मी आपल्या देशाचा अविभाज्य भाग मानतो.”
“मी एकतेबद्दल बोलत होतो, भारत एक आहे, आपले लोक एक आहेत आणि आपण एकत्र पुढे जायला हवे याबद्दल बोलत होतो. जर माझ्या बोलण्याचा कोणताही भाग चुकीचा समजला गेला किंवा दुखावणारा ठरला, तर मला याचा खेद आहे. माझा हेतू शांती, प्रगती आणि एकजुटतेची चर्चा करणे हा होता,” असे स्पष्टीकरण विजय देवरकोंडाने दिले आहे. Vijay Devarakonda |
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, विजय देवरकोंडा ‘किंगडम’ चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट ४ जुलै २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :





