‘भारत-पाक युद्धात पाच विमाने पाडली गेली’; डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा

Donald Trump | राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय वारंवार घेतले आहे. या युद्धात भारताची विमानं पाडल्याचा दावा पाकने केले होता. याचबाबत आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे.
भारत-पाकवर ट्रम्प यांचा नवा दावा
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, ‘आम्ही अनेक युद्धे थांबवली आहेत, हे कोणतेही सामान्य युद्ध नव्हते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील परिस्थिती खूपच बिकट झाली होती, खूप गंभीर होती. विमाने पाडली जात होती. माझा अंदाज आहे की सुमारे पाच लढाऊ विमाने पाडली गेली होती. हे दोन्ही देश अण्वस्त्रसंपन्न आहेत आणि एकमेकांवर हल्ला करत होते.’ मात्र ही विमान कोणत्या देशाची पाडली हे त्यांनी स्पष्ट केले नाही. Donald Trump |
यापूर्वी ट्रम्प काय म्हणाले होते?
ही पहिली वेळ नाही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी असे दावे केले आहेत, भारताने सातत्याने नकार दिल्यानंतरही ते त्यांच्या वक्तव्यापासून मागे हटले नाहीत. त्यांनी तर असंही म्हटलं आहे की व्यापाराला हत्यार बनवून त्यांनी युद्ध थांबवलं.
ट्रम्प म्हणाले होते की, मी फोन करून हे संपवलं आणि सांगितलं की जर तुम्ही एकमेकांशी लढलात तर आम्ही कोणत्याही प्रकारचा व्यापारी करार करणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र आहेत, त्यांनी सांगितलं की आम्हाला व्यापारी करार हवा, आम्ही हा तणाव व्यापाराद्वारे थांबवला, असा दावा ट्रम्प यांनी केला. इराण अणू शक्ती कार्यक्रम नष्ट करण्यातही अमेरिकेने मोठी भूमिका निभावली असल्याचे ते म्हणाले आहेत. Donald Trump |
ऑपरेशन सिंदूर –
ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने 6-7 मे च्या रात्री पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर (PoK) मधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला होता. या हवाई हल्ल्यात भारताने पाकिस्तानचे 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव खूप वाढला होता, पण 10 मे रोजी दोन्ही देशांनी युद्धविरामाची घोषणा केली होती. Donald Trump |
हेही वाचा
Varsha Usgaonkar : वर्षा उसगावकर अन् अशोक सराफ या मालिकेतून दिसणार एकत्र, सेटवरचा फोटो समोर





