कमी फी, मोठा नफा! ‘किंगडम’ सिनेमासाठी अभिनेता विजय देवरकोंडाने घेतला मोठा निर्णय

Vijay Deverakonda | विजय देवरकोंडा सध्या त्याच्या किंगडम या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाविषयी विजय नेहमीच आपल्या चाहत्यांना अपडेट देत असतो. सोशल मीडियावर या सिनेमाविषय़ी काही ना काही अपडेट येतच असते. पण आता या सिनेमाच्या निर्मात्यांनी एक अपडेट दिली आहे. पण हि अपडेट सिनेमाची नसून सिनेमात काम करणाऱ्या विजयने घेतलेल्या फीची आहे.
विजय देवरकोंडा स्टारर ॲक्शन थ्रिलर सिनेमा ‘किंगडम’ रिलीजसाठी सज्ज झाला आहे. निर्मात्यांनी नुकताच या सिनेमाचा पहिला टीझर रिलीज केला असून, त्यानंतर चाहत्यांमध्ये या सिनेमाची प्रचंड उत्सुकता वाढली आहे. आता हा सिनेमा आणखी एका कारणाने चर्चेत आला आहे. सिनेमाचे निर्माते नागा वामसी यांनी विजयच्या फीशी संबंधित मनोरंजक माहिती शेअर केली आहे. एका मुलाखती दरम्यान त्यांनी याविषयी सांगितले आहे.
किंगडमचे निर्माते नागा वामसी यांनी उघड केले आहे की विजय देवरकोंडाने त्याची फी म्हणून फक्त एक टोकन रक्कम घेतली आहे. हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज झाल्यावर सिनेमाच्या नफ्यातून तो त्यातील काही भाग घेईल,असे सांगितले आहे. यामुळे अशा प्रकारे आम्ही सिनेमा मोठ्या स्केलवर बनवण्यासाठी अधिक पैसे गुंतवू शकतो, असा खुलासा केला आहे. प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यांनी या सिनेमाला संगीत दिले आहे.
गौतम तिन्ननुरी दिग्दर्शित हा सिनेमा यावर्षी 30 मे रोजी रिलीज होणार आहे. यात भाग्यश्री बोरसे आणि सत्यदेव यांसारख्या कलाकारांच्याही प्रमुख भूमिका आहेत.




