Vidyut Jamwal – सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचा सीझन सुरु झालाय असं दिसून येत आहे. काहीच दिवसांपूर्वी अभिनेत्री परिणीती चोप्राने राघव चढ्ढा सोबत लग्न केलं. आता परिणीतीनंतर अभिनेता विद्युत जामवाल (Vidyut Jamwal) लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं बोललं जातंय.
सोशल मीडियावर देखील संबंधित काही बातम्या येताना दिसत आहेत. गेल्या वर्षी 2022 मध्ये सप्टेंबरमध्ये विद्युतने डिझायनर नंदिता महतानी (Nandita Mahtani) सोबत साखरपुडा केला होता. आता ते लग्न करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
त्यांच्या लग्नाचे विधी लंडनमध्ये पार पडणार आहेत. जवळचे मित्र आणि कुटुंबीय अश्या ठराविक लोकांमध्येच लग्नाचे विधी पार पडणार आहेत. त्यामुळे कदाचित हा विवाह सोहळा खाजगी पद्धतीनेच होणार अश्याच दिसून येत आहे.
विद्युत आणि नंदिता या दोघांनी बरेच दिवस त्यांचे नाते गुप्त ठेवले होते. पण आता दोघांच्या लग्नाच्या बातम्या समोर आल्याने त्यांच्या फॅन्सना आनंद झालाय. दरम्यान, नंदिताचे हे दुसरे लग्न आहे. तिने पहिल्यांदा उद्योगपती संजय कपूरसोबत लग्नगाठ बांधली होती.