Palak Tiwari-Ibrahim : पलक तिवारी आणि इब्राहिमच्या ब्रेकअपच्या चर्चा; तीन वर्षाच्या लव्हस्टोरीचा The End
Palak Tiwari-Ibrahim : २०२२ पासून या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू

Palak Tiwari-Ibrahim : अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम आणि अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहेत.
अनेकदा दोघे एकत्रही पाहायला मिळाले. कधी पार्टीत, तर कधी एकत्र सुट्ट्यांचा आनंद घेताना हे दोघे पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. मात्र एकमेकांना डेटिंग केल्यानंतर आता दोघेही वेगवेगळ्या मार्गे जाणार असल्याची चर्चा होत आहे.
तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर आता हे कपल परस्पर सहमतीने वेगळे झाल्याचे वृत्त समोर आले आहे. मात्र, दोघांच्या विभक्त होण्यामागचं नेमकं कारण समोर आलेलं नाही. काही रिपोर्ट्समध्ये दोघांनी परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचंही म्हटलं जात आहे.
दरम्यान, ब्रेकअपच्या बातमीनंतरही या दोघांनीही सोशल मीडियावरून एकमेकांना अनफॉलो केलेलं नाही. इब्राहिमचा एक मोठा टॉक शो लवकरच रिलीज होणार असल्याने त्याला या मुलाखतीदरम्यान ब्रेकअपच्या चर्चा टाळायच्या आहेत. म्हणूनच दोघांनीही हे प्रकरण शांत ठेवल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, इब्राहिम खान आणि पलक तिवारी हे इंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल मानले जात होते. त्यांच्या या लोकप्रियतेमुळेच काही जाहिराती आणि फोटोशूट्स करण्याचा प्लॅन आखला जात होता.
मात्र, आता ही बातमी समोर आल्यानंतर हे सर्व प्रोजेक्ट्स रद्द करण्यात आले आहेत किंवा काही काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहेत. २०२२ पासून या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ब्रेकअपच्या वृत्तावरही दोघांनी मौन बाळगणेच पसंत केले आहे.
हेही वाचा :





