Mrunal Thakur : मृणाल ठाकूरचा साडीतील सुंदर लुक; चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
Mrunal Thakur : हिरव्या रंगाच्या साडीत मृणालचे फोटोशूट

Mrunal Thakur : अभिनेत्री मृणाल ठाकूरने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनयासह तिच्या सौंदर्याचेही अनेकजण चाहते आहेत. नुकतेच तिने सोशल मिडियावर तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. पारंपरिक लूकसोबतच तिचा यात एक वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे.
मृणालने इनस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या फोटोत ती हिरव्या रंगाच्या साडीत पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने साडीसोबत चॉकलेटी रंगाचा ब्लाउज परिधान केला आहे, जो तिच्या संपूर्ण आउटफिटला खूपच सुंदर कॉन्ट्रास्ट देत आहे.
View this post on Instagram
तिचा हा लुक चाहत्यांच्या ही पसंतीस पडला असून, अनेकांनी तिच्या या लुकचे कौतुक केले आहे. सध्या तिच्या फोटोवर लाइक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.
मृणाल ठाकूरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ‘लव्ह सोनिया’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने विविध प्रकारच्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण केले.
तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबाबतही चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. त्यामुळे मृणाल पुढे कोणत्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा:
Tukaram Mundhe : अजय देवगणची हायकोर्टात धाव; तुकाराम मुंढेंचा थेट इशारा म्हणाले “FDA ची कारवाई…”





