Vidhan Parishad Election : खासदार पार्थ पवार यांचा मास्टरस्ट्रोक? विक्रम काकडे यांचे नाव विधानपरिषदेवर जवळपास निश्चित
Vidhan Parishad Election : राष्ट्रवादीची विधानपरिषद जागा पुण्याला

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले असल्याने सर्वच पक्षांमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या सर्वाधिक चर्चा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी कोणाला संधी मिळणार याची आहे. विशेष म्हणजे, पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत पार्थ पवार यांची वाढती भूमिका लक्षवेधी ठरत असून, या निवडणुकीत त्यांच्या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या विधान परिषद निवडणुकीच्या माध्यमातून पार्थ पवार यांना स्वतःची विश्वासू आणि सक्षम टीम तयार करण्याची मोठी संधी असल्याचे बोलले जात आहे. पुढील तीन वर्षांनंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार असल्याने पक्ष संघटन अधिक मजबूत करणे आवश्यक मानले जात आहे.
यासाठी अनुभवी नेत्यांसोबतच नव्या दमाचे, तरुण आणि विश्वासू चेहरे पुढे आणण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे ही निवडणूक पार्थ पवारांसाठी दीर्घकालीन राजकीय रणनीतीचा महत्त्वाचा भाग ठरू शकते. (Vidhan Parishad Election)
कोणाची नावे चर्चेत ? (Vidhan Parishad Election )
पक्षातील सूत्रांच्या माहितीनुसार, प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय माजी आमदार राजेंद्र जैन, माजी आमदार अमोल मिटकरी, पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे, प्रवक्ते आनंद परांजपे, उमेश पाटील यांची नावे चर्चेत आहेत. यासोबतच माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांचे नाव देखील जोरदार चर्चेत आले आहे.
या सर्व नावांमध्ये विक्रम काकडे यांची चर्चा अधिक ठळकपणे होताना दिसत आहे. त्यांची ओळख पार्थ पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून असून, पक्ष नेतृत्वासोबत त्यांचे अनेक वर्षांपासून जवळचे संबंध आहेत. अजित पवार आणि त्यांच्या परिवारासोबत त्यांनी सातत्याने काम केले आहे. त्यामुळे पक्षातील नव्या नेतृत्वामध्ये त्यांचे नाव गांभीर्याने घेतले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहरात अधिक बळकट
याशिवाय विक्रम काकडे यांना मजबूत राजकीय वारसा लाभला आहे. पुणे शहरात यापूर्वी त्यांचे वडील संजय काकडे यांनी मोठी संघटनात्मक ताकद उभी केली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ४० नगरसेवक निवडून आल्याची नोंद आहे. हीच ताकद भविष्यात विक्रम काकडे यांच्या माध्यमातून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे शहरात अधिक बळकट करू शकते, अशी पक्षांतर्गत चर्चा सुरू आहे.
त्यामुळे विधान परिषदेसाठी चर्चेत असलेल्या नावांपैकी अंतिम संधी कोणाला मिळणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. विक्रम काकडे यांच्या निवडीच्या माध्यमातून पार्थ पवार यांचा हा एक मोठा मास्टरस्ट्रोक ठरणार का, याची उत्सुकता आता वाढली आहे. गुरुवारी (दि.३० एप्रिल) याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा:






