MANISH SISODIA: आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पाठोपाठ, पक्षाचे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया यांनीही दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती स्वर्ण कांता यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात सिसोदिया यांनी,” उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात त्यांच्या वतीने कोणताही वकील हजर होणार नाही आणि त्यांचा न्यायावर विश्वास राहिलेला नाही. सत्याग्रहाशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही, असे त्यांनी म्हटले आहे. पक्षाच्या सूत्रांनुसार, सिसोदिया यांनी आपल्या पत्रात, “माझ्या वतीनेही कोणताही वकील हजर होणार नाही. तुमच्या मुलांचे भविष्य तुषार मेहताजींच्या हातात आहे. अशा परिस्थितीत, मला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा नाही. सत्याग्रहाशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही.” असे म्हटले आहे. अरविंद केजरीवाल यांयांचेही न्यायमूर्ती स्वर्ण कांता यांना पत्र MANISH SISODIA: या अगोदर केजरीवाल यांनी कायदेशीर कार्यवाहीबद्दल चिंता व्यक्त करणारे असेच एक पत्र लिहिले होते. न्यायमूर्ती स्वर्ण कांता यांच्याकडून न्याय मिळण्याची त्यांची आशा मावळली आहे, असे त्यांनी पत्रात लिहिले होते. त्यामुळे, त्यांनी महात्मा गांधींच्या सत्याग्रहाच्या मार्गाचे अनुसरण करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी लिहिले आहे की, “त्यांनी हा निर्णय आपल्या सद्सद्विवेकबुद्धीनुसार घेतला असून, न्यायमूर्ती स्वर्णकांत शर्मा यांच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा त्यांना अधिकार आहे.” MANISH SISODIA: प्रकरण काय आहे? MANISH SISODIA: हे संपूर्ण प्रकरण दिल्ली मद्य धोरण २०२१-२२ शी संबंधित आहे. मद्य धोरणात अनियमितता केल्याचा आणि काही विशिष्ट व्यक्तींना फायदा पोहोचवल्याचा आरोप माजी सरकारवर आहे. अंमलबारी संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणात केजरीवाल आणि सिसोदिया दोघेही आरोपी आहेत, परंतु दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. सीबीआयने या आदेशाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले. हे प्रकरण आता उच्च न्यायालयात आहे, परंतु न्यायमूर्ती शर्मा यांना सुनावणीतून काढून टाकल्यासच आपण सुनावणीच्या कामकाजात सहभागी होऊ, अशी मागणी करणारे पत्र केजरीवाल यांनी लिहिले आहे. या पत्रामुळे आता कायदेशीर आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.