Vidhan Parishad Election: भाजपकडून विधानपरिषदेची उमेदवारी कोणाला मिळणार? पक्षश्रेष्ठींकडून आदेश अन् रवींद्र चव्हाण दिल्ली रवाना
BJP Vidhan Parishad Election 2026 : दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेत्यांशी चर्चा करुन 5 उमेदवारांची नावं निश्चित होण्याची शक्यता आहे.

BJP Vidhan Parishad Election 2026 : विधानपरिषदच्या 9 जागांसाठी येत्या 12 मे रोजी निवडणूक होणार असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे. विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी मिळावी, यासाठी भाजपमध्ये सध्या प्रचंड रस्सीखेच सुरु आहे.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील भाजपच्या कोअर कमिटीने तब्बल 30 जणांच्या नावांची यादी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे पाठवली होती. मात्र दिल्लीतील वरिष्ठांनी सुधारित यादी पाठवण्याचे आदेश दिले. त्यानंतर महाराष्ट्र भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठी 14 जणांच्या नावांची सुधारित यादी पुन्हा दिल्लीला पाठवली आहे.
विधान परिषदेसाठीच्या 14 उमेदवारांची नावे दिल्लीला पाठवल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण देखील दिल्लीला रवाना झाले आहेत. आता दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेत्यांशी चर्चा करुन 5 उमेदवारांची नावं निश्चित होण्याची शक्यता आहे.
Junaid Khan: जुनैद खानचा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांना सिद्धार्थ शुक्लाची आठवण का झाली?
समोर आलेल्या माहितीनुसार, विधानपरिषदेसाठी मुंबई वगळता राज्यातील पाच विभागांमधून संधी दिली जाईल. तसेच पक्षातील जुन्या आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याची माहिती आहे.
संभाव्य उमेदवार कोण?
भाजपचे विधानपरिषद निवडणुकीसाठी राजेश पांडे, दयाशंकर तिवारी, राम सातपुते, रणजितसिंह निंबाळकर, माधवी नाईक, डॉ. उपेंद्र कोठेकर, मनोज कोटक, केशव उपाध्ये, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे, रवी अनासपुरे.
संजय काका पाटील, विवेक कोल्हे, जगदीश मुळीक, प्रमोद जठार, संजय केणेकर यांची नावं उमेदवारीसाठी चर्चेत आहे. त्यामुळे भाजपकडून कोणती पाच नावे अंतिम केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा:






