Sanjay Nirupam: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर संजय निरुपमांचे स्पष्टीकरण; म्हणाले “शिवसेना म्हणून आम्हाला…”
Sanjay Nirupam: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू

Sanjay Nirupam: मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या सुरू आहेत. यावर काही नेतेमंडळी आपल्या प्रतिक्रिया देत आहे. याचदरम्यान आता संजय निरुपम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
“राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात राज्यातील वर्तमानपत्रे आणि प्रसारमाध्यमांमध्ये सातत्याने चर्चा सुरू असते. मात्र, शिवसेना म्हणून आम्हाला या विषयावर कोणतेही भाष्य करायचे नाही. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा घेऊन शिवसेना पुढे चालवत आहोत. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाने काँग्रेससोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे आमच्याबाबत कोणीही अशा प्रकारच्या चर्चा करू नयेत,” असे निरुपम यांनी सांगितले आहे.
छटपूजेच्या मुद्द्यावरही यावेळी निरुपम यांनी भाष्य केले. “मुंबई उच्च न्यायालयाने गिरगाव चौपाटीवर छटपूजेचे आयोजन करू नये, असा आदेश का दिला, हे आम्हाला अद्याप समजलेले नाही. नियमानुसार छटपूजा नदीकिनारी व्हायला हवी. मात्र, मुंबईतील नद्यांचे महापालिकेच्या कारभारामुळे नाल्यांमध्ये रूपांतर झाले आहे. त्यामुळे मुंबईतील उत्तर भारतीय समाजाकडून समुद्रकिनाऱ्यावर छटपूजेचे आयोजन केले जाते.
गिरगाव चौपाटीवर छटपूजा करण्यास स्थानिक प्रशासनाचा नेमका काय आक्षेप आहे, हे आम्हाला समजलेले नाही. छटपूजा हे आमच्या संस्कृतीचे प्रतीक आहे. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माचे आचरण करण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे प्रशासनाने या अधिकाराचा आदर करावा, अशी आमची मागणी आहे,” असे संजय निरुपम यांनी सांगितले.





