विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस ठरणार किंगमेकर ! ‘ती’ 9 मतं ठरणार निर्णायक

मुंबई : उद्या म्हणजेच 12 जुलै रोजी राज्यात विधानपरिषदेची निवडणूक पार पडणार आहे. सध्याचे राजकारण पाहता या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीदरम्यान बहुतांश राजकीय पक्षांनी आपले आमदार फुटू नयेत, यासाठी त्यांना हॉटेलमध्ये शिफ्ट केले आहे. आजपर्यंतचा विधानपरिषदेचा इतिहास पाहता या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात आमदार फोडले जातात. या निवडणुकीदरम्यान सगळ्यांचे लक्ष काँग्रेसकडे असणार आहे. कारण त्यांच्याकडे सध्या सर्वात जास्त एक्सट्रा मते आहेत.
काँग्रेस ठरणार किंगमेकर
धान परिषद निवडणुकीत काँग्रेसकडे 37 मतं आहेत आणि काँग्रेसने 1 उमेदवार दिला आहे. काँग्रेसचा उमेदवार निवडून येण्यासाठी 24 पहिल्या पसंतीची मतं आवश्यक आहेत, पण कोणताही घोळ टाळण्यासाठी काँग्रेस किमान 27 ते 28 मतं आपल्या उमेदवाराला देतील. यानंतरही काँग्रेसकडे 9 ते 10 मतं शिल्लक राहतात.काँग्रेसकडे शिल्लक असलेली ही 9 ते 10 मतं महाविकासआघाडीतील उमेदवाराला जातात का महायुतीच्या उमेदवाराला जातात? हे पाहणे महत्वाचे असणार आहे. त्यामुळे 1 वा उमेदवार निवडून आणण्यात काँग्रेस किंग मेकर ठरणार हे निश्चित आहे. या निवडणुकीत विधान सभेच्या 288 आमदारांपैकी 278 आमदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
विधान परिषदेसाठी कुणाचे किती उमेदवार?
भाजप
पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, डॉक्टर परीणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत
शिवसेना
कृपाल तुमाने, भावना गवळी
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार
राजेश विटेकर, शिवाजी गर्जे
काँग्रेस
प्रज्ञा सातव
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
जयंत पाटील, शेकाप ( पाठिंबा)





