Video Viral : तरुणीशी गैरवर्तन करणाऱ्या परप्रांतीय तरुणाला मनसे पदाधिकाऱ्यांकडून चोप

ठाणे – मागील काही दिवसांत महिलांवरील अत्याच्याराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशीच काहीशी घटना ठाण्यात घडली असून येथील एका तरुणीला त्रास देणाऱ्या परप्रांतीय तरुणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चोप दिला.
मनसे पदाधिकाऱ्यांनी चोप दिलेला तरुण हा एसी मॅकेनिक आहे. तो गेल्या काही दिवसांपासून तरुणीला वारंवार अश्लील मेसेज पाठवत होता. त्यामुळे तरुणी वैतागली होती. अखेर या प्रकरणात मनसे पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत तरुणाच्या कार्यालयात जावून त्याला चोप दिला. तरुणाला मारहाण करताना व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर टाकण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
तरूणीला अश्लील मेसेज पाठणाऱ्या तरूणाला मनसे पदाधिकाऱ्यांकडून चोप @mnsadhikrut @TV9Marathi pic.twitter.com/jIYTn2HT9o
— CHETAN PATIL (@chetanpatil1313) March 23, 2021
सविस्तर माहिती अशी की, डोंबिवली पूर्वेतील देसले पाडा परिसरातपरप्रांतीय तरुण एका मराठी तरुणीस वारंवार अश्लील मेसेजे पाठवायचा. या प्रकरणाची माहिती मिळताच मनसेचे रस्ते आस्थापना डोंबिवली शहराध्यक्ष ओम लोके आणि शाखा प्रमुख रितेश माळी यांनी एसी दुरुस्ती करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयात जाऊन अश्लील मॅसेज करणाऱ्या भीम सहानी या तरुणाला तिथेच चोप दिला. यापुढे या तरुणीला कोणताही मेसेज पाठविणार नाही, अशी हमी भीम सहानी याने दिली. मुळचा उत्तर प्रदेशात राहणारा हा तरुण एसी मॅकेनिक आहे.





