विदर्भ ग्लोबल स्किल युनिव्हर्सिटी सज्ज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती

नागपूर : विदर्भ ग्लोबल स्किल युनिव्हर्सिटी तयार केली जाणार आहे. या ठिकाणी स्पेनमध्ये संत्रा उत्पादन शेतकऱ्यांना घेऊन जाऊन त्यांना तिथल्या मोठ्या उत्पादन देणाऱ्या शीड संदर्भात माहिती दिली जाईल. तसेच विदर्भातील सगळ्याच क्षेत्रात विकास झाला पाहिजे याची योजना आम्ही तयार केली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
नितीन गडकरी म्हणाले, महाराष्ट्रात यापुढे गडचिरोली हा सगळ्यात जास्त रेव्हेन्यू देणारा जिल्हा असेल. गडचिरोलीत साडेतीन लाख कोटींची खासगी गुंतवणूक होणार आहे. शेतकरी आत्महत्या, मेळघाट कुपोषण, आदिवासी भाग अशी विदर्भाचा एकेकाळी ओळख होती. पण आता हा भाग औद्योगिक विकासाचा क्षेत्र बनत असल्याचे गडकरी म्हणाले.
गडचिरोली जिल्ह्यात मी जेव्हा मंत्री असताना फिरत होतो तेव्हा पोलिसांची तीन लियर सुरक्षा राहत होती. पण आता गडचिरोलीची स्थिती बदलली आहे. तिथे उद्योगनगरी होत आहे. एअरपोर्ट होत असून येथे खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. सगळ्यात चांगल्या क्वालिटीचा आयर्न गडचिरोलीत आहे.
तसेच मोठी इन्व्हेस्टमेंट होत असल्याचे गडकरी म्हणाले. विदर्भातील मिहानमध्ये आय टी सेक्टरची सुरुवात झाली तेव्हा काही लोकांनी त्याचा विरोध केला होता. पण आता त्या ठिकाणी रोजगार निर्मिती होत आहे. एमआरओ साठी आता विदेशात जाण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.
दुधाच्या क्षेत्रात विदर्भ संपन्न होईल
इंटरनॅशनल एअर पोर्टचे काम सुरु झाले आहे. येणाऱ्या काळात 3 लाखापेक्षा जास्त रोजगार निर्मिती होईल. दुधाच्या क्षेत्रात विदर्भ संपन्न होईल. आम्ही फक्त नागपूरबद्दल विचार करत नाही तर ज्या भागात जे आहे त्याला पुढे आणत आहोत, असेही गडकरी म्हणाले. नागपुरातून जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात निर्यात होऊ शकते, असेही ते म्हणाले.





