Lokmanya Tilak Award 2025 : पुण्यातील प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना; ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांनी केली घोषणा

पुणे : पुण्यातल्या लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्यावतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार यंदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रदान करण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांनी या नावाची घोषणा केली आहे.
दरवर्षी पुण्यात 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टवतीने पुरस्कार दिला जातो. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची सुरुवात लोकमान्य टिळक ट्रस्टतर्फे लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीला 1 ऑगस्ट 1983 पासून करण्यात आली. एक लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असते.
1983 पासून राष्ट्रीय पातळीवरील हा पुरस्कार देण्यात येतो. १ ऑगस्ट २०२५ या दिवशी सकाळी १०.३० वाजता टिळक स्मारक मंदिरात पुरस्काराच्या वितरणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार आहेत.





