चांगझोऊ – भारताच्या मालविका बनसोडने चीनमधील चांगझोऊ येथे सुरू असलेल्या चीन ओपन बॅडमिंटन 2024 स्पर्धेत महिला एकेरीत मोठा उलटफेर केला आहे. भारताच्या मालविका बनसोडने पॅरिस ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती ग्रेगोरिया मारिस्का तुनजुंग हिचा पहिल्या फेरीत पराभव करताना चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे.
मालविकाने इंडोनेशियाच्या तुनजुंगचे आव्हान 26-24, 21-19 असे सरळ सेटमध्ये मोडून काढले. अतितटीच्या लढतीत मालविकाने ही कामगिरी केली. पहिल्या सेटमध्ये मालविका व तुनजुंग यांची सातत्याने बरोबरी होत होती. शेवटी मालविकाने खेळ उंचावताना सेट जिंकून आघाडी घेतली.
Langkah Gregoria Mariska Tunjung terhenti di 32 besar China Open 2024 usai diadang wakil India, Malvika Bansod.
Tetap semangat, Jorji! #VictorChinaOpen2024#ChinaOpen2024#BadmintonIndonesia@BNI #BNIGlobalReachIndonesianPride pic.twitter.com/fU4GxBdtRx
— BADMINTON INDONESIA (@INABadminton) September 18, 2024
दुसऱ्या सेटमध्ये देखील मालविकाने चमकदार खेळ करताना 26 मिनिटात विजय साकारला. मालविका जागतिक क्रमवारीत 43 व्या स्थानी असून इंडोनेशियाची तुनजुंग सातव्या स्थानी आहे. 22 वर्षांच्या मालविकासमोर पुढील फेरीत दोन वेळेस राष्ट्रकुल पदक विजेती कर्स्टी गिलमोरचे आव्हान असणार आहे. मालविका वगळता इतर भारतीय खेळाडूंना या स्पर्धेत विशेष कामगिरी करता आली नाही.