China Open 2024 : स्पेनच्या पॉला बडोसाची उपांत्य फेरीत धडक…

China Open 2024 ( Paula Badosa vs Shuai Zhang) : स्पेनच्या 19व्या मानांकित खेळाडू पॉला बडोसाने आपली चमकदार कामगिरी सुरू ठेवत गुरुवारी येथे सुरू असलेल्या चायना ओपन टेनिस स्पर्धेत स्थानिक स्पर्धक झांग शुईचा पराभव करत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे.
पॉलाने झांग शुईला 6-1,6-7 असे सरळ सेटमध्ये पराभूत करताना आगेकूच केली. आता उपांत्य फेरीत बडोसाचा सामना अमेरिकेच्या कोको गॉफ आणि युक्रेनच्या युलिया स्टारोडबत्सेवा यांच्यातील विजेत्याशी होईल.
या स्पर्धेत पॉलाने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या अमेरिकेच्या जेसिका पेगूलाला 6-4,6-0 असे पराभूत करताना सनसनाटी निर्माण केली होती. तर दुसरीकडे जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या अमेरिकेच्या एम्मा नवारोला झांग शुईने पराभूत केले होते.
China Open 2024 : अल्काराजनं पटकावलं जेतेपद, गतविजेत्या सिनरला चारली पराभवाची धूळ…
दरम्यान, बडोसाने मे पासून 35 पैकी 28 सामने जिंकले आहेत आणि गेल्या पाच पैकी तीन स्पर्धांमध्ये उपांत्य फेरी गाठली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या यूएस ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीतही तिने मजल मारली होती.





