VIDEO : विकी कौशलच्या कृतीने अनेकांची मनं जिंकली; छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्ती पाहताच…

Vicky Kaushal | बॉलिवूड अभिनेता विकी कौशलने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अलीकडेच त्याला ‘छावा’ या चित्रपटामुळे मोठी लोकप्रियता मिळाली. यात त्याने साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेचे सर्वांकडून कौतुक करण्यात आले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली. सध्या सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ज्यात त्याने केलेल्या एका कृतीचे अनेकांकडून कौतुक केले जात आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये विकी कौशलला मुंबई विमानतळावर एक चाहता भेटला. तेव्हा त्या चाहत्याने विकी कौशलला शाल आणि छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती भेट म्हणून दिली. छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती स्वीकारताना विकी कौशलने केलेल्या कृतीमुळे सर्वांना आनंद झाला.
विकी कौशलच्या कृतीचे सर्वत्र कौतुक
विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांचा मान राखत मूर्ती स्वीकारताना पायातून बूट काढून चाहत्याकडून आदराने मूर्ती स्वीकारली. विकी कौशलच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. विकी कौशलचे संस्कार आणि त्याची आदर भावना यातून दिसत असल्याचे अनेकांनी म्हंटले आहे.
Vicky Kaushal respectfully removed his shoes before receiving Chhatrapati Sambhaji Maharaj’s murti from a fan ❤️ The most humble star of this gen ⭐#VickyKaushal pic.twitter.com/uzq5eHkoHZ
— Vicky Kaushal Nation (@vickyknation) August 25, 2025
संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘लव्ह अँड वॉर’मध्ये लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि विकी कौशल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
हेही वाचा:
“मतदानानंतर रेशन अन् आधारही हिसकावून घेणार…” ; राहुल गांधींची पुन्हा मोदी सरकारवर टीका





