Vaibhav India Jersey : “ज्यासाठी पहिल्यांदा बॅट उचलली, ते स्वप्न…” टीम इंडियाची जर्सी पाहून वैभव सूर्यवंशी भावुक; व्हिडीओ व्हायरल
Vaibhav India Jersey : आयर्लंडविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेपूर्वी जेव्हा पहिल्यांदा वैभवच्या हातात भारतीय संघाची अधिकृत जर्सी आली, तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला

Vaibhav Sooryavanshi Team India Jersey Video Viral : देशातील प्रत्येक युवा क्रिकेटपटूचे एकच स्वप्न असते, ते म्हणजे एक दिवस टीम इंडियाची निळी जर्सी अंगावर चढवणे. भारताचा अवघ्या १५ वर्षांचा ‘वंडर बॉय’ वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi ) याचे हे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरले आहे. आयर्लंडविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेपूर्वी जेव्हा पहिल्यांदा वैभवच्या हातात भारतीय संघाची अधिकृत जर्सी (India Jersey ) आली, तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. बीसीसीआयने २३ जून रोजी या भावूक क्षणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो सध्या तुफान व्हायरल होत आहे. (Vaibhav India Jersey)
रघू यांच्या पाया पडून घेतले आशीर्वाद – (Vaibhav India Jersey)
व्हायरल व्हिडीओमध्ये एक अत्यंत हृदयस्पर्शी क्षण कॅप्चर झाला आहे. टीम इंडियाचे (Team India )प्रसिद्ध थ्रोडाऊन स्पेशलिस्ट रघू जेव्हा हॉटेलच्या खोलीत वैभवसाठी जर्सीचा बॉक्स घेऊन गेले, तेव्हा दरवाजा उघडताच वैभवने सर्वप्रथम आदराने रघू यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले.
Ladies & Gentlemen
The moment the nation has been waiting for has arrived!
Vaibhav Sooryavanshi in #TeamIndia jersey. Witness this incredibly special moment ❤️ pic.twitter.com/sUUytFMPVw
— BCCI (@BCCI) June 23, 2026
यानंतर जर्सीचा बॉक्स उघडून जेव्हा त्याने निळी जर्सी हातात घेतली, तेव्हा तो काही क्षणांसाठी स्तब्ध झाला आणि त्याचे डोळे पाणावले. भावना व्यक्त करताना वैभव म्हणाला, “हा आनंद शब्दांत सांगता येणारा नाही. ज्या स्वप्नासाठी पहिल्यांदा हातात बॅट धरली होती, तो प्रवास आज पूर्ण झाला. हे एखाद्या स्वप्नासारखं वाटत आहे.”
आयपीएल २०२६ चा ‘ऑरेंज कॅप’ विजेता – (Vaibhav India Jersey )
वैभव सूर्यवंशीने अवघ्या १४ व्या वर्षी आयपीएलमध्ये (IPL2026) शतक झळकावून सर्वात तरुण शतकवीर खेळाडू बनण्याचा विक्रम केला होता. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेट गाजवल्यानंतर, नुकत्याच संपलेल्या आयपीएल २०२६ (IPL 2026) मध्ये वैभवने रेकॉर्डब्रेक ७१ षटकारांच्या मदतीने ७७६ धावा कुटल्या आणि ‘ऑरेंज कॅप’वर कब्जा केला. या ऐतिहासिक कामगिरीचे बक्षीस म्हणून त्याला थेट भारतीय संघात स्थान मिळाले. आता आयर्लंडच्या दौऱ्यावर या १५ वर्षांच्या वादळाची बॅट कशी तळपते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.





