Tukaram Mundhe : गुटखा मिळत नसल्याने तुकाराम मुंडेंना शिवीगाळ; परप्रांतीय कॅब चालकाचा व्हिडिओ व्हायरल होताच…
Tukaram Mundhe : गुटखा विक्री करण्याऱ्याच्या विरोधात मोक्का लावण्याचे जाहीर

Tukaram Mundhe : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार धडाडीचे अधिकारी तुकाराम मुंडे यांनी स्वीकारल्यानंतर सुप्त अवस्थेत असलेला हा विभाग खडबडून जागा झाला आहे. एरवी फक्त दसरा आणि दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कारवाई करणारा विभाग आता सतर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे.
अन्न व औषध प्रशासनाकडून मागील काही दिवसांत भेसळयुक्त पदार्थ तयार करणारे कारखाने, गुटखा, पानमसाल्याची विक्री करणारे आणि विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई केली जात आहे. याचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात गुटखा बंद केला असून गुटखा विक्री करण्याऱ्याच्या विरोधात मोक्का लावण्याचं जाहीर केलं आहे. तुकाराम मुंढे यांच्या या इशाऱ्यामुळे बहुतांश ठिकाणी गुटखा बंद झाला आहे.
एकीकडे तुकाराम मुंडे यांचे कौतुक होत असले तरी काही विकृत लोकांकडून त्यांच्याविरोधात राग व्यक्त केला जात असल्याचे समोर आले आहे. कल्याणमध्ये आता कोणत्याही टपरीवर गुटखा मिळत नसल्याने एका परप्रांतीय व्यक्तीने तुकाराम मुंढे यांच्याविरोधात व्हिडीओ करत त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली.
यानंतर पोलिसांनी देखील दुर्गाप्रसाद पांडे असे नाव असलेल्या आरोपीला ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेला दुर्गाप्रसाद पांडे हा कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी परिसरात राहणारा असून तो व्यवसायाने ओला कॅब चालक आहे.
नेमकं प्रकरण काय?
त्याचं झालं असं की, गेल्या काही दिवसांपासून राज्यात एफडीएच्या कडक कारवाईमुळे गुटखा मिळत नसल्याने आरोपी दुर्गाप्रसाद पांडे प्रचंड नाराज होता. त्यातच त्याच्या वडिलांची टपरी देखील बंद झाली होती.
या रागातून दुर्गाप्रसाद पांडे या ओला कॅब चालकाने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यामध्ये या पांडेने तुकाराम मुंढे यांना अश्लील आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि पोलिसांनी अवघ्या 4 तासांतच शोध घेत आरोपीला बेड्या ठोकल्या.
हेही वाचा:






