“मतदानानंतर रेशन अन् आधारही हिसकावून घेणार…” ; राहुल गांधींची पुन्हा मोदी सरकारवर टीका

Rahul Gandhi on Modi government। बिहारमध्ये एसआयआर विरोधात विरोधकांकडून मतदार हक्क यात्रा काढण्यात आली आहे. रॅलीच्या १२ व्या दिवशी राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी सीतामढी याठिकाणी जानकी माता मंदिराला भेट देऊन त्यांच्या यात्रेला सुरुवात केली. यावेळी त्यांनी सीतामढीच्या जनतेला संबोधित करताना निवडणूक आयोग आणि भाजपवर निशाणा साधला. राहुल गांधी यांनी,”आम्ही एकही मत चोरीला जाऊ देणार नाही. हे लोक आधी तुमचे मत घेतील, नंतर तुमचे रेशन कार्ड आणि नंतर आधारला लक्ष्य करतील” असे म्हणत मोदी सरकारवर निशाणा साधला.
सीतामढी याठिकाणी जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी, “आम्हाला माहिती आहे की ते बिहारमधील निवडणुका चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणूनच आम्ही मतदार हक्क यात्रा सुरू केली आहे. निवडणूक आयुक्तांना हे माहित असले पाहिजे की बिहारचे लोक हुशार आहेत आणि एकही मत चोरीला जाऊ देणार नाहीत.”असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
पुढे ते म्हणाले, “मी दलित बांधवांना सांगू इच्छितो. स्वातंत्र्यापूर्वी तुमची काय अवस्था होती ते आठवा? तुम्हाला मारहाण झाली, तुम्हाला अस्पृश्य म्हटले गेले. संविधानाने तुम्हाला अधिकार दिले आहेत. भाजप तुमच्याकडून अधिकार हिसकावून घेऊ इच्छित आहे. ६५ लाख मते कापली गेली आहेत. त्यात एकाही श्रीमंत माणसाचे नाव नाही. ते गरिबांची मते चोरत आहेत. ते तुमचा आवाज दाबू इच्छितात. ते तुमचा आवाज कधीही दाबू शकणार नाहीत. आम्ही तुमच्यासोबत उभे आहोत.” असे त्यांनी म्हटले.
भाजप, RSS मत चोर असल्याचे सिद्ध करू Rahul Gandhi on Modi government।
लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले, “तुम्ही या यात्रेत तुमची सर्व शक्ती पणाला लावली आहे. लहान मुले येत आहेत, माझ्या कानात कुजबुजत आहेत की नरेंद्र मोदी मते चोरतात. कर्नाटकमध्ये, आम्ही भाजपने मते चोरल्याचे पुरावे देऊन दाखवले आहे. यापूर्वी मी कधीही असे म्हटले नाही की भाजप आणि निवडणूक आयोग मते चोरत आहेत. आतापर्यंत मी फक्त कर्नाटकचा पुरावा दिला आहे. येणाऱ्या काळात मी लोकसभा निवडणुका आणि हरियाणा निवडणुकीचा पुरावा देईन. आम्ही हे सिद्ध करू की भाजप आणि आरएसएस मते चोरून निवडणुका जिंकतात.”
मोदींना राजेशाही स्थापण करायची आहे Rahul Gandhi on Modi government।
सीतामढीतील जाहीर सभेला संबोधित करताना तेजस्वी यादव म्हणाले, “आमचे काका (नितीश कुमार), जे सतत भूमिका बदलत राहतात, ते बिहारवर राज्य करण्याच्या स्थितीत नाहीत. बिहारच्या लोकांना रोजगार आणि नोकऱ्यांची गरज आहे.” ते म्हणाले की बिहार हे लोकशाहीचे जन्मस्थान आहे. भाजप आणि त्यांचे सहयोगी – निवडणूक आयोग – या भूमीतून लोकशाही संपवू इच्छितात. ते केवळ तुमचा मतदानाचा अधिकारच नाही तर तुमचे अस्तित्वही संपवू इच्छितात. नरेंद्र मोदीजी लोकशाही संपवून ‘राजेशाही’ स्थापित करू इच्छितात.





