पुण्यात भाजीपाला स्वस्त
Updated On:

पुणे – मार्केटयार्डातील तरकारी विभागात रविवारी कोथिंबिरीची सुमारे दीड लाख जुडी, मेथीची 1 लाख जुड्या इतकी आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक वाढली आहे. मागणीच्या तुलनेत आवक जास्त असल्याने सर्व प्रकारच्या पालेभाज्यांच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेने घट झाली होती. सर्व पालेभाज्यांचे भाव कमी झाले आहेत.
पालेभाज्यांचे जुडीचे भाव : कोथिंबीर : 6-10, मेथी : 5-7, शेपू : 12-14, कांदापात : 10-12, चाकवत : 5-10, करडई : 5-10, पुदिना : 3-4, अंबाडी : 5-6, मुळे : 5-10 , राजगिरा : 3-8, चवळई : 8-10, .
टॅग्स:





