Vasant More । मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांनी काल ‘साहेब मला माफ करा’ असं म्हणत मनसे पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांना नमस्कार करत फेसबुक पोस्ट शेअर केली. पुण्यातील मराठी माणसाच्या हक्काचा विषय असो वा एखाद्याला मदत करणं असो मोरे आपली प्रत्येक अपडेट सोशल मीडियावरून देत असतात. अशात त्यांनी पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे राजीनामा देत असल्याचे सांगितले. दरम्यान वसंत मोरे यांनी माध्यमांशी बोलतांना नवा खुलासा केला आहे. मोरे यांनी राज ठाकरेंचा त्यांना फोन आल्याचं सांगितलं. वसंत मोरे म्हणाले,’मला राज साहेबांचाही फोन एका पदाधिकाऱ्याच्या मोबाइलवर आला होता. पण त्या पदाधिकाऱ्याला मी एवढंच सांगितलं की, मी हात जोडतो. पण साहेबांचा फोन मला देऊ नको. कारण आजवर संघटनेतील खरी परिस्थिती मी राज ठाकरे यांच्या कानावर घालत आलो होतो. त्यामुळे आता राजीनामा दिल्यानंतर राज ठाकरे यांच्याशी बोलून मी त्यांना दुखवू इच्छित नाही”, अशी भावना वसंत मोरे यांनी व्यक्त केली.’ हेही वाचाच Vasant More । मनसेला जय महाराष्ट्र करणारे वसंत मोरे कोणत्या पक्षात जाणार? स्वतःच म्हणाले….. वसंत मोरे यांच्या राजीनाम्यानंतर मनसे नेत्याकडून बुटाचा फोटो पोस्ट