Varun Chakravarthy : वरूण चक्रवर्तीची कमाल! ICC च्या ‘या’ क्रमवारीत पटकावलं नंबर वन स्थान

फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने न्यूझीलंडच्या जैकब डफीला मागे टाकले असून, त्याने 733 गुणांसह पहिले स्थान पटकावले आहे, तर डफीकडे 717 गुण आहेत. भारतीय गोलंदाजांमध्ये वरुण व्यतिरिक्त रवि बिश्नोई (8 वे स्थान) आणि अक्षर पटेल (12 वे स्थान) यांनीही क्रमवारीत स्थान मिळवले आहे.
वरुण चक्रवर्तीने रचला इतिहास –
𝐓𝐇𝐄 #𝟏 𝐅𝐄𝐄𝐋𝐈𝐍𝐆 🤩
Varun Chakaravarthy achieves the top spot in the ICC Men’s T20I Bowling Rankings for the first time 👏
More ➡️ https://t.co/5fyPkfsIKO pic.twitter.com/JPc9ePKbul
— ICC (@ICC) September 17, 2025
वरुण चक्रवर्तीने टी-20 गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळवून इतिहास रचला आहे. तमिळनाडूच्या या खेळाडूने प्रथमच ही कामगिरी करणारा खेळाडू म्हणून आपले नाव नोंदवले आहे. 34 वर्षीय वरुणने 2021 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याने 20 टी-20 सामन्यांत 35 विकेट्स घेतल्या असून, त्याचा इकॉनमी रेट केवळ 6.83 आहे. विशेष म्हणजे, वरुणने दोनदा एकाच टी-20 सामन्यात पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.
आशिया कपमध्ये वरुण भारतासाठी तुरुपाचा इक्का –
आशिया कप 2025 मध्ये वरुण चक्रवर्ती भारतीय संघाचा महत्त्वाचा खेळाडू ठरला आहे. त्याने आतापर्यंत दोन सामन्यांत दोन विकेट्स घेतल्या असून, त्याचा इकॉनमी रेट उल्लेखनीय आहे. वरुण पॉवरप्लेपासून डेथ ओव्हर्सपर्यंत प्रभावी गोलंदाजी करू शकतो. दुबई आणि अबुधाबीच्या खेळपट्ट्या फिरकीपटूंसाठी अनुकूल असल्याने वरुण येथे अधिक प्रभावी ठरू शकतो.
हेही वाचा – INDW vs AUSW : स्मृती मंधानाचं तुफानी शतक, ऑस्ट्रेलियाविरुद्ध रचला इतिहास!
दुसरीकडे, कुलदीप यादवनेही आशिया कपमध्ये दोन सामन्यांत सात विकेट्स घेऊन दमदार कामगिरी केली आहे. त्याने यूएईविरुद्ध चार आणि पाकिस्तानविरुद्ध तीन विकेट्स घेतल्या. आता सर्वांचे लक्ष वरुण चक्रवर्तीच्या पुढील कामगिरीकडे लागले आहे.





