INDW vs AUSW : स्मृती मंधानाचं तुफानी शतक, ऑस्ट्रेलियाविरुद्ध रचला इतिहास!

स्मृती मंधानाने रचला इतिहास –
याशिवाय, स्मृती मंधाना भारतासाठी दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक शतके झळकावणारी खेळाडू बनली आहे. भारतासाठी सर्वात जलद शतकाचा विक्रमही मंधानाच्याच नावावर आहे. तिने 2025 मध्ये राजकोट येथे आयर्लंडविरुद्ध 70 चेंडूंमध्ये शतक ठोकले होते. तिने ताहलिया मॅकग्राथच्या 29व्या षटकातील पहिल्या चेंडूवर चौकार ठोकत आपले 12वे एकदिवसीय शतक पूर्ण केले.
मंधानाने ब्यूमॉन्टसची केली बरोबरी –
Star Power 🌟
Smriti Mandhana lights up the ODI series with a breathtaking 117 off just 91 balls against Australia Women!
A true masterclass in timing, elegance, and dominance. 🏏#mca #mcacricket #teammaha #cricketmaharshtra #teammaharashtra #smritimandhana pic.twitter.com/7qGrOqVQQi— Maharashtra Cricket Association (@MahaCricket) September 17, 2025
यासह ती महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत इंग्लंडच्या टॅमी ब्यूमॉन्टसह संयुक्त तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. ब्यूमॉन्टनेही 12 शतके ठोकली आहेत. या यादीत ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार मेग लॅनिंग 15 शतकांसह अव्वल स्थानी आहे, तर न्यूझीलंडची दिग्गज खेळाडू सुझी बेट्स 13 शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
हेही वाचा – पाकिस्तान बहिष्काराच्या पावित्र्यात? आयसीसीने पायक्रॉफ्टला हटविण्याची मागणी फेटाळली
महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात जलद शतके:
- 70 चेंडू – स्मृती मंधाना वि. आयर्लंड, राजकोट, 2025
- 77 चेंडू – स्मृती मंधाना वि. ऑस्ट्रेलिया, मुल्लांपुर, 2025
- 82 चेंडू – हरमनप्रीत कौर वि. इंग्लंड, चेस्टर-ले-स्ट्रीट, 2025
- 87 चेंडू – हरमनप्रीत कौर वि. दक्षिण आफ्रिका, बंगळुरू, 2024
- 89 चेंडू – जेमिमा रॉड्रिग्स वि. दक्षिण आफ्रिका, कोलंबो, 2025
दुसऱ्या वनडे सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाला स्मृती मंधानाने आश्वासक सुरुवात करून दिली. तिने प्रतिका रावल (25) सोबत पहिल्या गड्यासाठी 70 धावांची भागीदारी केली. प्रतिका 12व्या षटकात बाद झाली. त्यानंतर मंधानाने हरलीन देओल (10) सोबत दुसऱ्या गड्यासाठी 49 धावांची भागीदारी केली.
हेही वाचा – Smriti Mandhana: सांगलीच्या स्मृतीचा जगभरात दबदबा; ICC रँकिंगमध्ये पटकावले अव्वल स्थान
हरलीन 19व्या षटकात बाद झाली. यानंतर मंधानाने कर्णधार हरमनप्रीत कौरसोबत तिसऱ्या गड्यासाठी 33 धावांची भागीदारी केली. हरमनप्रीत 26व्या षटकात 17 धावा काढून बाद झाली. मंधाना 33व्या षटकात ताहलिया मॅकग्राथच्या गोलंदाजीवर अॅशले गार्डनच्या हाती झेलबाद झाली.





