Neeraj Chopra : नीरज चोप्रा वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दाखल! वेबर, नदीमशी होणार कांटे की टक्कर

जूलियन वेबरचे नीरजपेक्षा सरस प्रदर्शन –
विशेष म्हणजे, पहिल्या फेरीत नीरज हाच एकमेव खेळाडू होता ज्याने थेट पात्रता मिळवली. नीरज व्यतिरिक्त जर्मनीचा जूलियन वेबर यानेही अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. जूलियन वेबरने नीरज चोप्रापेक्षा अधिक अंतरावर भाला फेकून अंतिम फेरी गाठली. वेबरने 87.21 मीटरचा थ्रो करत आपली जागा पक्की केली. आता नीरजला आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी करावी लागणार आहे. वेबरशिवाय अंतिम फेरीत पाकिस्तानचा अरशद नदीम याच्याशीही नीरजचा सामना होण्याची शक्यता आहे.
पॅरिस ऑलिम्पिकनंतर नीरज-नदीम पुन्हा आमनेसामने –
One step closer! 🚀
JSW Sports athlete @Neeraj_chopra1 qualifies for the World Athletics Championships 2025 final with a massive throw of 84.85M. 🔥#JSWSports #NeerajChopra #WorldAthleticsChamps #BetterEveryDay pic.twitter.com/9XHEbXsrg8
— JSW Sports (@jswsports) September 17, 2025
वेबरशिवाय अंतिम फेरीत पाकिस्तानचा अरशद नदीम याच्याशीही नीरजचा सामना होण्याची शक्यता आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 नंतर प्रथमच हे दोन दिग्गज खेळाडू मोठ्या व्यासपीठावर एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. पॅरिसमध्ये अरशद नदीमने 92.97 मीटर थ्रोसह सुवर्णपदक पटकावले होते, तर नीरजने 89.45 मीटर थ्रोसह रौप्यपदक मिळवले होते.
हेही वाचा – INDW vs AUSW : स्मृती मंधानाचं तुफानी शतक, ऑस्ट्रेलियाविरुद्ध रचला इतिहास!
पात्रता फेरीतील गट –
He Knew It 😃
The Moment He threw #NeerajChopra #WorldAthleticsChamps pic.twitter.com/14dIZK3ENy— IndiaSportsHub (@IndiaSportsHub) September 17, 2025
वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या पात्रता फेरीत नीरज चोप्राला गट अ मध्ये ठेवण्यात आले होते. या गटात जूलियन वेबर, वाल्कोट, वाडलेज आणि भारताचा सचिन यादव यांचा समावेश होता. दुसरीकडे, गट ब मध्ये पाकिस्तानचा अरशद नदीम याच्यासह ट्रिनिडाडचा पीटर्स, केनियाचा येगो, ब्राझीलचा दा सिल्वा आणि भारताचे रोहित यादव व यशवीर सिंi यांचा समावेश होता.
हेही वाचा – पाकिस्तान बहिष्काराच्या पावित्र्यात? आयसीसीने पायक्रॉफ्टला हटविण्याची मागणी फेटाळली
पात्रतेची प्रक्रिया काय आहे?
वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी खेळाडूंना भाला 84.50 मीटरपेक्षा अधिक अंतरावर फेकणे आवश्यक आहे. जे खेळाडू 84.50 मीटरचा टप्पा ओलांडतात किंवा दोन्ही गटांमधून टॉप-12 मध्ये स्थान मिळवतात, त्यांना अंतिम फेरीत प्रवेश मिळतो.





