पुणे जिल्हा | वाल्हे पीडीसी बँकेचा वर्धापनदिन उत्साहात

वाल्हे, (वार्ताहर) – पुरंदर तालुक्यतील वाल्हे येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा 107 वा वर्धापनदिन बुधवारी (दि. 4) ग्राहकांच्या उपस्थितीत, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते केक कापून व पेढे वाटून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, वाल्हे ग्रामपंचायतीचे सरपंच अतुल गायकवाड, माजी सरपंच महादेव चव्हाण, वागदरवाडी सरपंच सुनिल पवार, सुकलवाडी सरपंच संदेश पवार,
सागर भुजबळ, नाशिरखान पठाण, तुषार भुजबळ, सतीश पवार, अरविंद पवार, उद्योजक निखिल पवार, आदित्य राऊत, अतुल पवार, अभि दुर्गाडे, अनिकेत भुजबळ आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, शाखेच्या प्रवेशद्वारावर आकर्षक सुबक रांगोळी रेखाटून सभासदांचे स्वागत करण्यात आले होते. तसेच शाखेला फुले व फुग्यांची सजावट करण्यात आली होती.यावेळी शेतकरी सभासदांनी मनोगत व्यक्त केले.
वाल्हे शाखेतील शाखाप्रमुख संतोष दुर्गाडे, विकास अधिकारी मयूर भुजबळ, रोखपाल तरन्नुम आतार, अनिल पवार, महेश पवार, अभिजित पवार, मकरंद चव्हाण, विकास भुजबळ, सोसायटीचे सचिव राहुल जाधव, राजेश कुदळे, ज्ञानेश्वर पवार आदींनी कार्यक्रमांचे संयोजन केले. वाल्हे शाखेचे शाखाप्रमुख संतोष दुर्गाडे यांनी आभार मानले.





