Pune District : गोविंदामध्ये उत्साहाचे वातावरण

क्रीडामंत्री भरणे : मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट वाढ
इंदापूर – मानवी मनोरे रचण्याच्या प्रकारास साहसी खेळाचा दर्जा शासनाने दिला आहे. गोविंदाचा वाढता प्रतिसाद विचारात घेवून 2025 मधील दहीहंडी उत्सवाच्या अनुषंगाने क्रीडा विभागाकडून राज्यातील दीड लाख गोविंदाना शासकीय विमा कंपनीमार्फत विमा संरक्षण देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे गोविंदामध्ये उत्साहाचे वातावरण आहे, अशी माहिती क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, राज्य शासनाच्या या निर्णयामुळे गोविंदामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. याकरिता अंदाजे 1 कोटी 25 लाख एवढा निधी राज्य क्रीडा विकास निधीतून उपलब्ध करून देण्यात येईल.
2023 व 2024 मध्ये प्रत्येकी 75 हजार गोविंदांना ओरीएंटल इन्शुरन्स कंपनीमार्फत विमासंरक्षण देण्यात आले होते. यावर्षी गोविंदांच्या संख्येत दुपटीने वाढ करण्यात आली आहे. दहीहंडीमध्ये मनोरे रचताना तरुणांनी आपले काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.





