Pune District : रोटरी क्लब ऑफ इंदापूरचा पदग्रहण समारंभ उत्साहात

अध्यक्षपदी ऍड. नितीन शहा यांची नियुक्ती
इंदापूर – रोटरी क्लब ऑफ इंदापूर चा पदग्रहण समारंभ गुरुवारी (दि. 17) रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संतोष मराठे यांच्या अध्यक्षतेखाली व असिस्टंट गव्हर्नर डॉ. राजेश दाते, इंदापूर रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप गारटकर व संस्थापक उपाध्यक्ष मुकुंदशेठ शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी रोटरी वर्ष 2025-26 चे अध्यक्ष म्हणून अॅड. नितीन शहा व सचिव सचिवपदी प्रशांत घुले व खजिनदार म्हणून मनोहर बेद्रे यांनी पदभार स्वीकारला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी अध्यक्ष मोरेश्वर कोकरे यांनी केले.
नूतन अध्यक्ष नितीन शहा यांनी आपल्या मनोगतात येणार्या वर्षात करावयाची रोटरीची कामे व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे आयडियल स्टडी प याचे सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.
तसेच लसीकरण व रक्तदान शिबिरे आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिरे घेण्याचे उद्दिष्ट सांगितले. यावेळी प्रदीप गारटकर यांनी रोटरी क्लब इंदापूर स्थापन झाल्यापासून केलेल्या विविध सामाजिक कार्याचे माहिती सांगितली. नूतन अध्यक्ष व त्यांच्या सर्व संचालक मंडळांना शुभेच्छा दिल्या. तसेच मुकुंद शहा यांनी रोटरीची सामाजिक परंपरा व रोटरीची उद्दिष्टे याची माहिती दिली. प्रशांत घुले यांनी आभार मानले.





