पुणे जिल्हा : कडूस गावात श्री काळभैरवनाथ जन्म सोहळा उत्साहात

कडूस – फुलांची झालेली मुक्त उधळण, नाथ साहेबांचा चांगभलेच्या जय घोषाने तयार झालेल्या वातावरणात कडूस आणि परिसरातील भाविकांच्या उपस्थितीत, कडूस येथील श्री भैरवनाथ मंदिरात श्री काळभैरवनाथ जन्म सोहळा उत्साहात साजरा झाला.
काळभैरवनाथ अष्टमीनिमित्त श्री भैरवनाथ महाराज व माता जोगेश्वर यांची पुरोहित भूषण पारखी, पंकज थेटे, अनिरुद्ध पारखी, कांता गोडसे, विश्वास पाठक यांनी मंत्रोच्चारात महापूजा केली. प्रशांत मंडलिक यांनी दरवर्षीप्रमाणे आकर्षक फुले पुरविली. संतोषराव चासकर यांच्या सजावट कल्पनेने आणि कोपर्डे बंधूंच्या विद्युत रोषणाईने भाविकांची मने जिंकली.
देवस्थानचे पुजारी आण्णा गुरव यांनी संपूर्ण दिवसभरात श्रीची आकर्षक पूजा मांडली. हजारो भाविकांना श्रींच्या दर्शनाचा लाभ घेता आला. जन्माचे कीर्तन माऊली कदम महाराज (मोठे )आणि दत्ता महाराज आंबीरकर यांनी काल्याची कीर्तन सेवा पार पडली. कडूस ग्रामस्थ मंडळ, भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट यांनी व्यवस्था पाहिली. चास ( पडवळ)कडेवाडी, रूई सायाळ, गणेशवाडी आदी ठिकाणांहून भक्तगणांनी उपस्थिती दर्शवून दर्शनाचा लाभ घेतला





