नगर | वैष्णोदेवी यात्रेचा भक्तीमय वातारणात समारोप

श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- येथील जय माता दी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित वैष्णोदेवी दर्शन यात्रेचा काल भक्तमय वातावरणात समारोप झाला. या यात्रेत माजी नगरसेवक राजेश अलग व त्यांच्या सहकार्यांनी सादर केलेल्या ‘माता की चौकी’ ला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
गेल्या 15 वर्षांपासून जय माता दी मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष रविंद्र गुलाटी, माजी नगरसेवक राजेश आलघ यांच्यासह मंडळ पदाधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांना वैष्णोदेवीसह शिवखोडी, पटणी टॉप, अमृतसर, बाघा बार्डर, सुवर्ण मंदिर ठिकाणी जाते. यावर्षी 1150 एवढ्या मोठ्या प्रमाणात भाविकांनी या यात्रेत सहभाग नोंदविला.
जय माता दी मित्र मंडळ आयोजित यात्रेत सहभागी भाविक भारत -पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या वाघा बाॅर्डरवर पोहचले. दुपारी चार परेडच्यावेळी ‘भारत माता की जय,’ ‘वंदे मातरम’, ‘हिंदुस्तान जिंदाबाद अशा घोषणांनी वाघा बाॅर्डर परिसर दुमदुमून गेला. या आवाजाने कॅप्टन शर्मा यांनी या मंडळा बरोबर आलेल्या माजी नगरसेविका हेमा रविंद्र गुलाटी, उषा गाडेकर, साक्षी विखोना यांच्यासह अनेक महिलांनी भारतीय राष्ट्र ध्वज घेऊन परेड ग्रांऊडमध्ये बोलावून भारतीय राष्ट्रीय गीतावर सलामी देण्याची संधी दिली. तसेच देशभक्तीपर गीतावर नृत्य करण्याचा आनंदही त्यांनी लुटला.
या यात्रेतील भाविकांनी अमृतसर येथे सुवर्ण मंदिरात जाऊन श्री गुरु ग्रंथसाहेब यांचे मनोभावे दर्शन घेतले. भारतीय स्वातत्र्यांसाठी बलिदान देणार्यांचे स्मरण करून देणार्या जालियान बागला भेट दिली.वैष्णोदेवीच्या पायथ्याशी कटरा येथे झालेल्या ‘माता की चौकी’ कार्यक्रमाचे प्रास्तविक माजी उपनगराध्यक्ष रविंद्र गुलाटी यांनी केले.
या चौकीच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे कटारा मतदारसंघाचे आ. नंदकशोर शर्मा, जम्मुचे किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष जिन्हाजी पंडीत, श्रीरामपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक गाडेकर, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस नितीन दिनकर, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष दीपक पटारे आदी उपस्थित होते. रविवारी दुपारी 3 वाजता या यात्रेचा समारोप झाला. आमदार लहू कानडे, माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, अनिल भनगडे यांनी यात्रा करून आलेल्या भाविकांचे रेल्वे स्टेशनवर येऊन स्वागत केले.





