पुणे जिल्हा : मुळशीत पहाटेच्या काकड आरतीमुळे भक्तिमय वातावरण

पौड : मुळशीतील ग्रामीण भागातील सर्वच गावच्या मंदिरामध्ये पहाटेच्या काकड आरतीचा मधुर स्वर निनादतो. कोजागरी पौणिमेपासून काकड आरतीला सुरुवात होते आणि त्रिपुरारी पौर्णिमेर्पंत काकड आरतीचा अखंड गजर सुरू असतो. एक महिना चालणारा उत्सव निद्रिस्त देवादिकांना जागविण्यासाठी केला जातो, अशी समजूत आहे.
गावांमध्ये काकडा आरतीमध्ये टाळ, मृदंग, हार्मोनियम तालावर काकडा सादर करतात आताही अनेक गावांमध्ये ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. पहाटेच्या समयी भाविक उठून, स्नान आटोपून मंदिरात जाऊन काकड आरती करत असतात परंपरागत लोक एकत्रित सामूहिकपणे काकडा आरती करीत आहे.
त्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात होते; परंतु अलिकडच्या काळामध्ये काकडा आरतीमधील गर्दी ओसरू लागली आणि काकडा आरतीमध्ये येणार्याची संख्याही कमी झाली असून काही लोक गावातील ज्येष्ठ पुरूष, महिला मंदिरात एकत्र येऊन काकडा आरती करतात.
आरती दरम्यान तीन मंगलाचरण, काकड आरतीचे अभंग, भूपाळ्याचे अभंग, पूजेची ओळ, सातवी मालिका, वासुदेव, आंधाळा पांगुळ, मुका, बहिरा, गौळणी आदींसह गणपतीची, विठ्ठलाची आरती होते. त्यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येते.





