Vaishno Devi Yatra: वैष्णो देवी यात्रेच्या मार्गावर दरड कोसळली; दोन महिला भाविकांचा मृत्यू, एक जण जखमी
Updated On:

Vaishno Devi Yatra – जम्मू काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात त्रिकुटा पर्वतावर स्थित माता वैष्णो देवी मंदिराच्या मार्गावर दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत दोन महिला भाविकांचा मृत्यू झाला असून एक मुलगी जखमी झाली आहे. काही अन्य माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार दुर्घटनेत तिन जणांचा मृत्यू झाला असून अन्य बरेच जण अडकले असल्याची माहिती दिली आहे.
यात्रा मार्गावर ज्या ठिकाणी दरड कोसळली तो भाग पंछी हेलिपॅडपासून जवळच आहे. त्यामुळे दरड कोसळल्यामुळे अनेक भाविक तेथे अडकले असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. मंदिर प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.
मंदिर प्रशासनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले की यात्रा मार्गावर दगड कोसळल्यामुळे जमीनही खचली आहे. बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून पुढील माहिती येण्याची वाट पाहिली जाते आहे.





