Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे प्रकरणावर नाना पाटेकर यांचं मोठं विधान, काय म्हणाले एकदा पाहाच….

Nana patekar । Vaishnavi Hagawane : पुण्यात हगवणे कुटुंबाने वैष्णवीचा इतका जाच केला की तिला जगण्यापेक्षा मृत्यू अधिक सोपा वाटला. तिच्या मृत्यूनंतरची जी कहाणी समोर आली आहे, ती अत्यंत संतापजनक असून त्याने संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे.
वैष्णवी मृत्यू प्रकरणातील तिची सासू, नवरा आणि नणंद यांना पोलिसांनी अटक केली असून, गेल्या सात दिवसांपासून फरार असणारा तिचा सासरा आणि दीराला देखील पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, वैष्णवी प्रकरणानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. यावर दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनी देखील प्रतिक्रिया दिला आहे. नाना पाटेकर म्हणाले, ‘हुंडाबळी ही प्रकराची वृत्ती आहे. हुंडा घेणाऱ्या लोकांना कायद्यानुसार शिक्षा होईल.
लग्नावर अनाठायी खर्च करायचा की नाही ही प्रत्येकाचा स्वतःचा निर्णय आणि संस्काराचा भाग आहे. माध्यापुरतं बोलायचं झालं तर, मी लग्नात खर्च करण्यापेक्षा तो निधी वृद्धाश्रम, अनाथश्रम किंवा मुलांच्या शिक्षणासाठी हेईल…’
पुढे नाना पाटेकर म्हणाले, ‘दौलतजादा करणारी आणि व्यसनाधीन माणसे समाजाचा भाग आहेत. अशी माणसं समाजात असतात आणि हे वास्तव नाकारता येत नाही… झाडावर रोग येतो म्हणून झाडे वाढवायची नाहीत का? फळे चाखायची नाहीत का? लग्न सोहळे हा प्रत्येकाचा खासगी विषय आहे.’
‘प्रत्येक क्षेत्रात विसंगती आहे. हा काय मूर्खपणा सुरु आहे… याची चर्चा करण्यापेक्षा मी काय यावर काय करु शकतो… हा विचार आपण करायला हवा. समाजातील विसंगती आम्ही मांडतो…’ असं नाना पाटेकर यावेळी म्हणाले आहेत. सध्या त्यांच्या या विधानाची सगळीकडे चर्चा होता दिसत आहे.





