Vaishnavi Hagawane : ‘…तिथेच पेटवून देईन’ पत्रकार परिषदेत बोलताना वैष्णवीचे वडिल असं का म्हणाले…

पुणे : मागच्या काही दिवसांपासून वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) प्रकरण मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येताना दिसत आहेत. सध्या या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी चालू आहे. हगवणे (Vaishnavi Hagawane) कुटंबाने आपल्या वकिलामार्फत पहिल्याच सुनावणीत धक्कादायक दावे केले आहेत. या दाव्यानंतर वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे सगळे दावे खोडून काढले आहेत. तसेच त्यांनी शशांक हगवणेच्या बाबतीत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
अनिल कस्पटे यांचा मोठा गौप्यस्फोट
मी एमजे हेक्टर गाडी बुक केली होती. फॉर्च्युनर गाडी घेण्याच्या अगोदर मी वाकडच्या शोरुमला ही गाडी बुक केली होती. त्यासाठी 50 हजार रुपये डिपॉझिट केले होते. त्याची पावतीदेखील माझ्याकडे आहे. यावरून शशांक हगवणे यांनी माझ्याशी वाद घातला. मला एमजे हेक्टर गाडी दिली तर मी ती घेणार नाही. त्या गाडीला तिथेच पेटवून देईन असे शशांक हगवणे म्हणाला होता. मला फक्त फॉर्च्युनर गाडीच पाहिजे असे तो म्हणाला. त्यानंतर मी लग्नात फॉर्च्युनर गाडी दिली, असा खुलास अनिल कस्पटे यांनी केला.
माझ्या मुलीची दोन लग्न मोडली
मी दिलेली फॉर्च्युनर गाडी ही स्वखुशीने दिलेली नाही. तर मला ती गाडी मागण्यात आलेली आहे. मी लग्नाला उभं राहणार नाही. लग्न मोडून टाकेन अशी धमकी शशांकने दिली होती. अगोदरच माझ्या मुलीची दोन लग्न मोडली. त्यातही मला हे लग्न जबरदस्तीने करावं लागलं. माझ्याकडे सोन्याची, चांदीची, गाडीची मागणी केली, असा धक्कादायक आरोप वैष्णवींच्या वडिलांनी केला आहे.
हगवणेंच्या वकिलांनी काय केले होते दावे ?
वैष्णवी (Vaishnavi Hagawane) अन्य मुलाशी चॅटिंगवर बोलायची, असा दावा हगवणेच्या वकिलाने केला. तसेच आमच्याकडे पाच कोटींच्या फक्त गाड्या आहेत तर आम्ही 40 लाखांच्या गाडीसाठी कशाला तिचा छळ केला असता असा दावा हगवणे कुटुंबाकडून करण्यात आला होता.





