Vaibhav Suryavanshi : आयपीएल २०२५ गाजवल्यानंतर वैभव सूर्यवंशीचे समस्तीपूरमध्ये जंगी स्वागत, पाहा VIDEO

Vaibhav Suryavanshi welcomed home after IPL 2025 : आयपीएल २०२५ मध्ये वैभव सूर्यवंशीने पदार्पणासह या हंगामात अनेक विक्रम आपल्या नावावर केले. वैभवने ३५ चेंडूत शतक ठोकून या हंगामात सर्वात जलद शतक ठोकणारा पहिला भारतीय युवा फलंदाज बनला. या काळात त्याने आणखी काही चांगल्या खेळी खेळल्या. मात्र, राजस्थानचा आयपीएल २०२५ मधील प्रवास आता संपला आहे. ज्यामुळे वैभव समस्तीपूर येथील आपल्या घरी परतला असून त्याचे जंगी स्वागत करण्यात आले, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
आयपीएल २०२५ चा हंगाम संपवून वैभव सूर्यवंशी घरी पोहोचला, तेव्हा त्याचे कुटुंबीय, मित्र आणि आजूबाजूच्या लोकांनी मोठ्या थाटामाटात स्वागत केले. वैभवच्या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त करत त्याने केक कापला आणि त्याला हार घातला. आज, केवळ त्याच्या पालकांनाच नाही तर संपूर्ण देशाला वैभवचा अभिमान आहे की तो इतक्या लहान वयात मोठ्या गोष्टी साध्य करत आहे.
राजस्थान रॉयल्सने वैभवच्या स्वागताचा व्हिडीओ शेअर केला-
View this post on Instagram
वैभव सूर्यवंशी आयपीएलमधील दमदार कामगिरीनंतर घरी परतल्यावर जंगी स्वागत करण्यात आले. या स्वागताचा व्हिडीओ राजस्थान रॉयल्सने आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना लिहिले की, ‘त्याने आयपीएल खेळण्यासाठी वैभव म्हणून घर सोडले होते. पण जेव्हा तो आयपीएल खेळून परतला तेव्हा बॉस बेबी वैभव झाला. त्याचे स्वागत एखाद्या बॉस बेबीसारखे झाले.’
हेही वाचा – IPL 2025 च्या फायनल सामन्यावरुन नवा वाद! बीसीसीआयवर टीकेची झोड, काय आहे प्रकरण?
राजस्थान रॉयल्सने वैभवसाठी मोजले होते एक कोटी –
राजस्थान रॉयल्सने वैभव सूर्यवंशीला १३ वर्षांचा असताना २०२४ मध्ये झालेल्या लिलावात १.१ कोटी रुपयांना विकत घेतले होते. यानंतर तो आयपीएलमध्ये सहभागी होणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. त्याने आयपीएलमध्ये सर्वात तरुण पदार्पण करणारा खेळाडू बनून इतिहास रचला. त्यानंतर वैभवने कधीही मागे वळून पाहिले नाही. तो एकामागून एक पराक्रम करत राहिला.
हेही वाचा – Shikhar Sophie Video : ‘अब्बा डब्बा जब्बा…’, शिखर धवन गर्लफ्रेंड सोफीच्या हिंदीने चकित, VIDDEO होतोय व्हायरल
वैभवने राजस्थान रॉयल्ससाठी ७ सामन्यात २५२ धावा केल्या. या काळात त्याने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले. गुजरातविरुद्ध ३५ चेंडूत शतक केल्यानंतर, त्याने या हंगामातील त्याच्या शेवटच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध ५७ धावा केल्या. वैभवची उत्कृष्ट कामगिरी पाहून बीसीसीआयने त्याला इंग्लंड दौऱ्यासाठी अंडर-१९ संघात समाविष्ट केले आहे. जिथे भारतीय अंडर-१९ संघ सराव सामन्यांसह एकदिवसीय आणि बहु-दिवसीय सामने खेळेल





