CSK vs RR : वैभव सूर्यवंशीने धोनीच्या पाया पडून जिंकली सर्वांची मनं, VIDEO होतोय व्हायरल

CSK vs RR Vaibhav Suryavanshi’s respectful gesture towards MS Dhoni : आयपीएल २०२५ चा ६२ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात राजस्थानने चेन्नईचा ६ विकेट्सनी पराभव केला. सामन्यानंतर, राजस्थान रॉयल्सचा युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी धोनीच्या पाया पडला, ज्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
वैभव आणि धोनीचा व्हिडीओ व्हायरल –
चेन्नई सुपर किंग्जने दिलेल्या १८८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, राजस्थान रॉयल्सच्या १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने ३३ चेंडूत ५७ धावांची शानदार अर्धशतक झळकावून राजस्थानला चांगली सुरुवात करून दिली आणि सामन्यात विजयाच्या जवळ पोहोचवले. १४ व्या षटकात अश्विनच्या चेंडूवर रवींद्र जडेजाने वैभवला झेलबाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
𝙈𝙤𝙢𝙚𝙣𝙩𝙨 𝙩𝙤 𝙘𝙝𝙚𝙧𝙞𝙨𝙝 😊
This is what #TATAIPL is all about 💛🩷#CSKvRR | @ChennaiIPL | @rajasthanroyals pic.twitter.com/hI9oHcHav1
— IndianPremierLeague (@IPL) May 20, 2025
वैभव सूर्यवंशीने झळकावले अर्धशतक –
अशा परिस्थितीत, राजस्थान रॉयल्सने केवळ १८.१ षटकांत लक्ष्य गाठले आणि त्यांचा आयपीएल २०२५ चा प्रवास विजयाने संपवला. सामन्यानंतर, जेव्हा खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करत होते, तेव्हा राजस्थान रॉयल्सचा युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीच्या पाया पडला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हेही वाचा – MI vs DC : मुंबईविरुद्धच्या ‘करो या मरो’ सामन्यापूर्वी दिल्लीला मोठा धक्का! ‘या’ स्टार खेळाडूला झाली दुखापत
वैभव सूर्यवशीने पायाला स्पर्श करताच धोनीने त्याच्याकडे प्रेमाने पाहिले आणि त्याच्याशी हस्तादोलन केले. हा खास क्षण कॅमेराने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. आता सोशल मीडियावर चाहते वैभव सूर्यवंशीच्या या कृतीचे कौतुक करत आहेत. वैभव सूर्यवंशी हा बिहारचा असून उल्लेखनीय धोनीने बिहारसाठी अनेक घरगुती सामने खेळून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.





