Vaibhav Sooryavanshi Rankings : १५ वर्षांच्या पोराने ICC रँकिंगचा टेबलच हालवला! २३० खेळाडूंना पछाडत वैभव सूर्यवंशीची ‘या’ नंबरवर थेट एंट्री
Vaibhav Sooryavanshi Rankings : आयसीसीच्या ताज्या टी-२० फलंदाजी क्रमवारीत वैभव सूर्यवंशीने मोठी ऐतिहासिक झेप घेतली आहे.

Vaibhav Sooryavanshi Huge Jump ICC T20I Batting Rankings : झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेत आपल्या बॅटने धुमाकूळ घालणाऱ्या भारताच्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) आयसीसीच्या ताज्या टी-२० फलंदाजी क्रमवारीत मोठी ऐतिहासिक झेप घेतली आहे. मालिकेत दोन धडाकेबाज अर्धशतकांसह १५१ धावा कुटणाऱ्या आणि ‘प्लेयर ऑफ द सिरीज’ ठरलेल्या वैभवने थेट २३० स्थानांची मोठी झेप घेतली आहे. इंग्लंड मालिकेअखेर २७८ व्या क्रमांकावर असलेला वैभव आता ५३६ रेटिंग पॉईंट्ससह थेट ४८ व्या स्थानावर पोहोचला आहे.
इशान किशन नंबर-१ वर स्थानावर कायम; अभिषेक शर्माची घसरण!
झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत शानदार कामगिरी करणाऱ्या इतर भारतीय फलंदाजांचा विचार केला तर, मालिकेत १४५ धावा करणारा इशान किशन ९१० रेटिंग पॉईंट्ससह जगातील नंबर-१ टी-२० फलंदाज म्हणून अव्वल स्थानी कायम आहे. दुसरीकडे, या मालिकेत पूर्णपणे अपयशी ठरलेल्या अभिषेक शर्माला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. बराच काळ अव्वल स्थानांच्या शर्यतीत दबदबा राखणारा अभिषेक आता ८१९ रेटिंग पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे.
तिलक वर्माचीही रँकिंगमध्ये सुधारणा –
🚨 HUGE ACHIEVEMENT FOR VAIBHAV SURYAVANSHI 🚨
ICC has updated the T20I batters rankings and now Vaibhav Sooryavanshi is the 48th ranked T20I batter in the World 🔥
He scored 193 runs in first 6 T20I matches, which is a good start for 15 year old 👏🏻pic.twitter.com/CZ6PIs5qtB
— Ajay Jadeja (@AjayJadeja171) July 29, 2026
या मालिकेत ३ डावांमध्ये ७७ धावा करत एक अर्धशतक झळकावणाऱ्या भारताच्या उपकर्णधार तिलक वर्मालाही क्रमवारीत फायदा झाला आहे. तो ७५० रेटिंग पॉईंट्ससह सहाव्या क्रमांकावर पोहोचला असून, त्याने इंग्लंडच्या हॅरी ब्रूक आणि जॉस बटलर या दिग्गजांना मागे टाकले आहे.
हेही वाचा – Shubman Gill No 1 : आयसीसी क्रमवारीत शुबमन गिलचा दबदबा! बनला जगातील नंबर-१ फलंदाज
पाकिस्तानचा साहिबजादा फरहान दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयसीसी क्रमवारीत भारतीय संघाचे वर्चस्व आहे. वनडे आणि टी-२० या दोन्ही प्रकारांमध्ये संघ अव्वल स्थानी आहे. कसोटीत भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर आहे.





