Vaibhav Suryavanshi : वैभवला भारताच्या वरिष्ठ संघात स्थान मिळणार नाही, काय आहे ICC चा नियम? जाणून घ्या

Vaibhav Suryavanshi IPL 2025 Sensation Eyes International Cricket : बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल २०२५ मध्ये पदार्पण सामना खेळत सर्वांचे लक्ष वेधलं. त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार मारत क्रिकेट चाहत्यांना आणि आजी माजी खेळाडूंना आश्चर्यचकित केले. यानंतर त्याने आपल्या तिसऱ्या आयपीएल सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध ऐतिहासिक शतक झळकावत आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा धमाका केला.
वैभव सूर्यवंशीचा भारतीय राष्ट्रीय संघात समावेश करण्याची मागणी –
वैभवला या हंगामातील सर्वात मोठा उदयोन्मुख खेळाडू मानले जात आहे आणि लोक त्याला क्रिकेटचे भविष्य म्हणू लागले आहेत. त्याच्या तिसऱ्या सामन्यातच, वैभवने फक्त ३५ चेंडूत शतक झळकावून आयपीएलच्या इतिहासात आपले नाव नोंदवले. ही बातमी जगभरात चर्चेचा विषय बनली आहे. ज्या वयात बहुतेक मुले शाळेत शिकत असतात, त्या वयात वैभव मोठ्या स्टेडियममध्ये जगातील अव्वल गोलंदाजांची धुलाई करत आहे.
This amazing kid 🙌 #vaibhavsuryavanshi pic.twitter.com/EVBJfD1WRq
— Kadambini Sharma (@SharmaKadambini) April 29, 2025
वयाबद्दल आयसीसीचा काय आहे नियम –
“We’re happy to be part of his journey” – #RahulDravid
Head Coach of #RR, Rahul Dravid, shares how various people have played a role in shaping the incredible journey & growth of #VaibhavSuryavanshi! 🩷
📺 📱Watch Press Room ft. Rahul Dravid, Head Coach of Rajasthan Royals,… pic.twitter.com/4UBtrWe6vL
— Star Sports (@StarSportsIndia) May 1, 2025
अनुभवी क्रिकेटपटू आणि चाहत्यांनी आता वैभव सूर्यवंशीचा भारतीय राष्ट्रीय संघात समावेश करण्याची मागणी सुरू केली आहे. अनेकांचा असा विश्वास आहे की वैभवमध्ये भविष्यात एक उत्तम खेळाडू बनण्याची पूर्ण क्षमता आहे. पण त्याच्या मार्गात एक अडथळा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) २०२० मध्ये एक नियम बनवला, ज्यानुसार कोणताही खेळाडू १५ वर्षांचा होईपर्यंत आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकत नाही. वैभव सध्या १४ वर्षांचा आहे आणि २७ मार्च २०२६ रोजी तो १५ वर्षांचा होईल. याचा अर्थ असा की सध्या तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकत नाही.
हेही वाचा – CSK vs PBKS : पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर सीएसकेच्या सीईओंनी धोनीशी केली चर्चा, VIDEO होतोय व्हायरल
तथापि, सर्व आशा संपलेल्या नाहीत. आयसीसीच्या या नियमात एक खास गोष्ट म्हणजे जर एखाद्या खेळाडूला पुरेसा अनुभव असेल, मानसिक समज असेल आणि तो शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे तयार असेल तर त्याला वयोमर्यादेपूर्वीही खेळण्याची परवानगी दिली जाऊ शकते. जर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) हे प्रकरण योग्य पद्धतीने आयसीसीसमोर मांडले आणि आयसीसीनेही ते मान्य केले तर वैभवला लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळू शकते.
हेही वाचा – Shreyas Iyer : सीएसकेविरुद्धच्या विजयानंतर श्रेयसला ‘ती’ चूक पडली महागात, बीसीसीआयने ठोठावला दंड
सर्वात कमी वयात आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याचा विक्रम –
विशेष म्हणजे, आतापर्यंत सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा विक्रम पाकिस्तानच्या हसन रझाच्या नावावर आहे. त्याने आपला पहिला कसोटी सामना केवळ १४ वर्षे २२७ दिवसांच्या वयात खेळला होता. भारतात हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे, ज्याने १६ वर्षे २०५ दिवसांच्या वयात पदार्पण केले होते.





