Vaibhav Sooryavanshi Record : वैभव सूर्यवंशी ठरला षटकारांचा नवा बादशहा! अभिषेक शर्माला मागे टाकत आयपीएलमध्ये रचला इतिहास
Vaibhav Sooryavanshi Record : या सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्ससमोर १९४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

Vaibhav Sooryavanshi Most Sixes Record IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या हंगामात प्रत्येक सामन्यागणिक नवे विक्रम रचणारा राजस्थान रॉयल्सचा १५ वर्षीय स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा क्रिकेट जगताला थक्क केले आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरताच वैभवने आपल्या वादळी फलंदाजीने एक असा महाविक्रम केला आहे, जो आजवर आयपीएल इतिहासात कोणत्याही भारतीय फलंदाजाला जमला नव्हता. या सामन्यात आपल्या डावातील तिसरा षटकार ठोकताच वैभव आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक षटकार ठोकणारा भारतीय खेळाडू बनला आहे.
अभिषेक शर्माचा मोडला विक्रम –
दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केली. डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या वैभवने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. या सामन्यात त्याने २१ चेंडूंत ४६ धावांची वेगवान खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ३ उत्तुंग षटकार ठोकले. या तिसऱ्या षटकारासह चालू हंगामात त्याच्या एकूण षटकारांची संख्या ४३ वर पोहोचली आहे. यासह त्याने सनरायझर्स हैदराबादच्या अभिषेक शर्माचा विक्रम मोडला. अभिषेकने २०२४ च्या हंगामात ४२ षटकार ठोकले होते.
At just 15 years of age, Vaibhav Sooryavanshi has achieved something even some IPL legends couldn’t 💥🔥
🏏 Most sixes by an Indian batter in a single IPL season
🔹 43 Sixes in IPL 2026
🔹 Surpassed Abhishek Sharma’s 42 sixes record from 2024📸: JioStar pic.twitter.com/nUdiLWD9Ld
— CricInformer (@CricInformer) May 17, 2026
एका आयपीएल हंगामात सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय खेळाडू:
- वैभव सूर्यवंशी: ४३* षटकार (वर्ष २०२६)
- अभिषेक शर्मा: ४२ षटकार (वर्ष २०२४)
- श्रेयस अय्यर: ३९ षटकार (वर्ष २०२५)
- विराट कोहली: ३८ षटकार (वर्ष २०१६ आणि २०२४)
- सूर्यकुमार यादव: ३८ षटकार (वर्ष २०२५)
ख्रिस गेलच्या ‘वर्ल्ड रेकॉर्ड’च्या दिशेने वाटचाल –
आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा जागतिक विक्रम वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर आहे, ज्याने २०१२ मध्ये ५९ षटकार ठोकले होते. या यादीत आता १५ वर्षांचा वैभव थेट सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. जर वैभवने चालू हंगामात ५० षटकारांचा टप्पा ओलांडला, तर ख्रिस गेल आणि आंद्रे रसेल (५२ षटकार, २०१९) यांच्यानंतर एकाच हंगामात ५० किंवा त्याहून अधिक षटकार मारणारा तो जगातील केवळ तिसरा फलंदाज ठरेल.





