Vaibhav Sooryavanshi Selection : वैभव सूर्यवंशीची ‘या’ दिवशी होणार भारतीय सीनियर संघात निवड; बीसीसीआयने दिली अपडेट
Vaibhav Sooryavanshi Selection : वैभव सूर्यवंशी भारतीय वरिष्ठ संघाकडून कधी खेळणार, याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. अशात वैभवच्या निवडीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Vaibhav Sooryavanshi Team India Selection Update : आयपीएल २०२६ मध्ये आपल्या वादळी फलंदाजीने क्रिकेट जगताला थक्क करणारा १५ वर्षांचा वंडर बॉय वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) सध्या चांगलाच चर्चेत आहे. आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप जिंकणारा वैभव सध्या ‘इंडिया ए’ संघासोबत श्रीलंका दौऱ्यावरील तिरंगी मालिकेत व्यस्त आहे. मात्र, चाहत्यांना उत्सुकता आहे की त्याची भारतीय सीनियर संघात कधी निवड होणार? आता यावर बीसीसीआय (BCCI) कडून एक मोठे अपडेट समोर आली आहे.
एशियन गेम्स २०२६ मध्ये मिळणार संधी!
रिपोर्टनुसार, बीसीसीआय ६ जून रोजी जपानमध्ये होणाऱ्या ‘एशियन गेम्स २०२६’ साठी भारतीय संघाची घोषणा करणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी वैभव सूर्यवंशीला टीम इंडियाचे तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे. बीसीसीआय सहसा एशियन गेम्ससाठी युवा खेळाडूंना प्राधान्य देते; जसे की गेल्या वेळी यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग आणि ध्रुव जुरेल यांना संधी मिळाली होती.
𝐈𝐧𝐝𝐢𝐚 𝐀 𝐬𝐪𝐮𝐚𝐝 𝐟𝐭. 𝐭𝐞𝐞𝐧 𝐬𝐞𝐧𝐬𝐚𝐭𝐢𝐨𝐧 𝐕𝐚𝐢𝐛𝐡𝐚𝐯 𝐒𝐨𝐨𝐫𝐲𝐚𝐯𝐚𝐧𝐬𝐡𝐢 𝐡𝐚𝐬 𝐥𝐚𝐧𝐝𝐞𝐝 𝐢𝐧 𝐒𝐫𝐢 𝐋𝐚𝐧𝐤𝐚 𝐟𝐨𝐫 𝐭𝐡𝐞 𝐓𝐫𝐢-𝐬𝐞𝐫𝐢𝐞𝐬!
📸 Sri Lanka Cricket pic.twitter.com/9p9CrwmbZh
— Sportstar (@sportstarweb) June 5, 2026
यंदा एशियन गेम्स १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२६ दरम्यान खेळवले जाणार आहेत. ६ जून रोजी एशियन गेम्ससोबतच आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावरील टी-२० मालिकेसाठीही संघ जाहीर होणार असून, सूर्यकुमार यादवऐवजी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद सोपवले जाणार आहे.
आयपीएल २०२६ मधील ‘वैभव’शाली रेकॉर्ड!
वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना १६ सामन्यांत तब्बल ७७६ धावा कुटल्या होत्या. २०० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने खेळताना त्याने १ शतक आणि ५ अर्धशतके झळकावली. विशेष म्हणजे, एकाच हंगामात ६३ चौकार आणि तब्बल ७२ षटकार ठोकून त्याने आयपीएलच्या एकाच मोसमात सर्वाधिक षटकार मारण्याचा ऐतिहासिक रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. त्याच्या याच कामगिरीमुळे आता त्याला थेट भारतीय जर्सीमध्ये पाहण्यासाठी फॅन्स उत्सुक आहेत.





