Vaibhav Sooryavanshi Flop : वैभव सूर्यवंशीची साडेसाती संपेना! तिरंगी मालिकेतील सलग चौथ्या सामन्यात ठरला अपयशी
Vaibhav Sooryavanshi Flop : भारताचा १५ वर्षीय युवा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी हा मैदानावरील राड्यानंतर आता त्याच्या खराब फॉर्ममुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Vaibhav Sooryavanshi Flop Tri Series 2026 : श्रीलंकेत सुरू असलेल्या तिरंगी ‘अ’ एकदिवसीय क्रिकेट मालिकेत भारताचा १५ वर्षीय युवा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी हा मैदानावरील राड्यानंतर आता त्याच्या खराब फॉर्ममुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अफगाणिस्तान ‘अ’ संघाविरुद्धच्या सामन्यात वैभवचा (३८) आक्रमक पण छोटा डाव संपुष्टात आला. यासग वैभव सूर्यवंशी सलग चौथ्या सामन्यात अपयशी ठरला आहे. या मालिकेतील चार सामन्यात वैभवला एकदाही ५० धावांचा टप्पा ओलांडता आलेला नाही.
प्रियांश आर्याची फिफ्टी; वैभवला मिळाले दोन जीवनदान! (Vaibhav Sooryavanshi Flop)
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून यावेळेस वैभव सूर्यवंशी आणि प्रियांश आर्या ही नवीन सलामीची जोडी म्हणून मैदानात उतरली होती. प्रियांश सुरुवातीपासूनच आक्रमक खेळत होता, तर वैभवने सुरुवातीला सांभाळून खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, टी-२० स्टाईलने खेळण्याची सवय असलेल्या वैभवला जास्त वेळ संथ खेळता आले नाही. फलंदाजीदरम्यान नशिबाची साथ लाभल्याने वैभवला चक्क दोन जीवनदान मिळाले.
Just look at the Afghanistan A players reaction on Vaibhav Suryavanshi’s Controversial catch 😭😂pic.twitter.com/AEWAU8TLXa
— Cricket Central (@CricketCentrl) June 17, 2026
परंतु, या सुवर्णसंधीचा त्याला मोठा फायदा उठवता आला नाही. २८ चेंडूंचा सामना करत त्याने ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३८ धावांची छोटी खेळी केली. आठव्या षटकात ७५ धावांवर भारताला वैभवच्या रूपाने पहिला धक्का बसला. दुसऱ्या बाजूने प्रियांश आर्याने मात्र अवघ्या ३४ चेंडूंत आपले धडाकेबाज अर्धशतक पूर्ण केले. (Vaibhav Sooryavanshi Flop)
चार सामने झाले, पण मोठी खेळी दिसेना! (Vaibhav Sooryavanshi Flop)
टी-२० मध्ये धुमाकूळ घालणाऱ्या वैभवचा बल्ला या एकदिवसीय मालिकेत पूर्णपणे शांत राहिला आहे. वेगाने धावा करण्याच्या नादात तो मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरत आहे. या संपूर्ण मालिकेत त्याची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.
- पहिला सामना (विरुद्ध श्रीलंका): १२ चेंडूंत १४ धावा.
- दुसरा सामना (विरुद्ध अफगाणिस्तान): २२ चेंडूंत ४४ धावा (हीच त्याची सर्वोच्च धावसंख्या ठरली).
- तिसरा सामना (विरुद्ध श्रीलंका): १४ चेंडूंत २१ धावा (ज्या सामन्यानंतर वाद झाला होता).
- चौथा सामना (विरुद्ध अफगाणिस्तान): २८ चेंडूंत ३८ धावा.





