Vaibhav Sooryavanshi Record : १५ वर्षांच्या वैभवचा जागतिक विक्रम! सेहवाग-मॅक्सवेलला मागे टाकत IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा पहिलाच खेळाडू
Vaibhav Sooryavanshi Record : भारतीय क्रिकेटचा 'वंडर बॉय' मानल्या जाणाऱ्या वैभव सूर्यवंशीने आयपीएल इतिहासात सर्वात वेगवान असा भीमपराक्रम केला आहे

Vaibhav Sooryavanshi Fastest 500 IPL Runs Record: आयपीएल २०२६ च्या हंगामात राजस्थान रॉयल्सचा १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने आपल्या फलंदाजीने पुन्हा एकदा क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात त्याने केवळ ८ धावा केल्या असल्या तरी, या छोट्या खेळीत त्याने असा विक्रम प्रस्थापित केला आहे, जो दिग्गज फलंदाजांनाही जमला नाही.
भारतीय क्रिकेटचा ‘वंडर बॉय’ मानल्या जाणाऱ्या वैभव सूर्यवंशीने आयपीएल इतिहासात सर्वात वेगवान ५०० धावा पूर्ण करण्याचा भीमपराक्रम केला आहे. त्याने हा टप्पा अवघ्या २२७ चेंडूंमध्ये गाठला. २५० पेक्षा कमी चेंडूंमध्ये ५०० धावांचा टप्पा ओलांडणारा तो आयपीएलमधील पहिलाच फलंदाज ठरला आहे. लखनौविरुद्ध २ धावा पूर्ण करताच त्याने हा ऐतिहासिक रेकॉर्ड आपल्या नावे केला.
ग्लेन मॅक्सवेल आणि सेहवागचा रेकॉर्ड मोडीत –
🌳, 🌳, 🌳, 🌳, 🌳,W
Mohsin Khan becomes the first bowler to bowl a maiden to Vaibhav Sooryavanshi in the history of IPL. pic.twitter.com/uQfxgXwoD1
— Indian Cricket (@IPL2025Auction) April 22, 2026
यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर होता, ज्याने २६० चेंडूंमध्ये ५०० धावा केल्या होत्या. भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि युवा खेळाडू प्रियांश आर्या यांनी २८० चेंडूंत हा पल्ला गाठला होता. वैभवने या सर्व दिग्गजांना मागे टाकत टी-२० क्रिकेटमधील आपली आक्रमकता सिद्ध केली आहे.
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर –
227 balls. 500 runs. Pure carnage. ⚡️
Vaibhav Sooryavanshi is officially the fastest to the 500-run mark in IPL history[ Vaibhav sooryavanshi, Ipl, History, Young talent, Explore page, Trending post, Viral post] pic.twitter.com/3S9xayujm9
— SportsTiger (@The_SportsTiger) April 22, 2026
वैभव सूर्यवंशीने त्याच्या पदार्पणाच्या हंगामात २०६.५६ च्या स्ट्राईक रेटने २५२ धावा केल्या होत्या. मात्र, २०२६ च्या हंगामात त्याचा खेळ अधिकच बहरला आहे. सध्या तो २४० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत असून ७ सामन्यांत त्याने २५४ धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. तो सध्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीत चौथ्या क्रमांकावर असून हेनरिक क्लासेन, अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल यांसारख्या खेळाडूंना तगडी टक्कर देत आहे. अवघ्या १५ व्या वर्षी वैभवची ही प्रगल्भता पाहून त्याला भारतीय क्रिकेटचे भविष्य मानले जात आहे.





