Vaibhav World Record : जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ! १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने केला शतकातील सर्वात मोठा वर्ल्ड रेकॉर्ड
Vaibhav World Record : झिम्बाब्वेविरुद्ध तिसऱ्या टी-२० सामन्यात वैभव सूर्यवंशीने ४९ चेंडूंत ८१ धावांचे वादळी साकारली, ज्यामुळे भारतीय संघ ५ गडी गमावून १९२ धावांचा डोंगर उभारला.

Vaibhav Sooryavanshi World Record Two Fifty T20I IND vs ZIM 3rd T20I : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा १५ वर्षीय सलामीवीर वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) क्रिकेटच्या शेकडो वर्षांच्या इतिहासाला गवसणी घालत एक अभूतपूर्व जागतिक विक्रम रचला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात (Format) वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी दोन अर्धशतके (2 Half Centuries) झळकावणारा तो जगातील पहिला आणि एकमेव फलंदाज ठरला आहे. याआधी जागतिक क्रिकेटमध्ये कोणत्याही फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही.
नेपाळच्या कुशल मल्लाचा मोडला विक्रम –
रविवार, २६ जुलै रोजी खेळल्या जात असलेल्या या सामन्यात वैभवने केवळ ३१ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. याआधी मालिकेतील पहिल्या सामन्यातही त्याने वेगवान अर्धशतक ठोकून १५ व्या वर्षी टी-२० मध्ये अर्धशतक झळकावणारा पहिला क्रिकेटपटू बनण्याचा मान मिळवला होता. एकदिवसीय (क्रिकेटमध्ये नेपाळच्या कुशल मल्लाने १५ व्या वर्षी एक अर्धशतक झळकावले होते. मात्र, आजच्या सामन्यातील खेळीसह वैभवने दोन अर्धशतकांचा टप्पा गाठून आपले नाव इतिहास सुवर्ण अक्षरात लिहिले आहे.
पुरुष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ व्या वर्षी ५०+ स्कोअर:
History in the making! 🌟🇮🇳
Vaibhav Sooryavanshi becomes the first player to register multiple 50+ scores in men’s internationals before turning 16. What a sensational young talent! 👏🔥#VaibhavSooryavanshi #TeamIndia #ZIMvIND pic.twitter.com/7EHMBjpHCR
— SportsTiger (@The_SportsTiger) July 26, 2026
- २ – वैभव सूर्यवंशी (भारत)
- १ – कुशल मल्ला (नेपाळ)
वैभव सूर्यवंशीचे ४९ चेंडूंत ८१ धावांचे वादळ –
A solid batting effort led by Vaibhav Sooryavanshi’s fabulous knock 🔝
Over to our bowlers to defend 1️⃣9️⃣2️⃣ runs 🎯
Scorecard ▶️ https://t.co/oApMpI6eRc#TeamIndia | #ZIMvIND pic.twitter.com/20TaeRyVxk
— BCCI (@BCCI) July 26, 2026
या ऐतिहासिक सामन्यात वैभव सूर्यवंशीने कमालीचा संयम दाखवत ४९ चेंडूंत ८ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १६५.३५ च्या स्ट्राईक रेटने ८१ धावांची खेळी केली. अखेर त्याला वेस्ली मधेवेरेने ब्रॅड इव्हान्सच्या हाती झेलबाद केले. भारताने ही मालिका आधीच २-० ने जिंकली असून, वैभवच्या या वादळामुळे भारतीय संघ झिम्बाब्वेला ‘क्लीन स्वीप’ देण्याच्या उद्देशाने मजबूत स्थितीत पोहोचला आहे.





