शेवाळेवाडी गावातील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र सुरु करावे – राहुल शेवाळे

हडपसर – शेवाळेवाडी गाव नुकतेच महापालिकेत समाविष्ट झाले आहे. त्याठिकाणी महापालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी भाजप जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी केले आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ तसेच महापालिका सभागृह नेते गणेश बिडकर यांना निवेदन देऊन राहुल शेवाळे यांनी ही मागणी केली आहे. भाजपा पदाधिकारी सुनील शेवाळे, हवेली युवा मोर्चाचे सरचिटणीस दिनेश भंडारी उपस्थित होते. शेवाळेवाडी गावची लोकसंख्या सुमारे दहा हजार इतकी आहे.
मागील काळात आमच्याकडे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर होता.तशी यात अनेक कुटुंबे बाधीत झाली होती. त्यांना आता लसीकरण करणे खूप गरजेचे आहे. यासाठी पुणे महापालिकेच्या वतीने आमच्या नागरिकांसाठी ताबडतोब लसीकरण केंद्र सुरु करणे आवश्यक आहे. असे या निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान य संबधित अधिकारी यांना योग्य त्या सूचना करून शेवाळेवाडी गावातील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यात येईल,असे आश्वासन महापौरांनी दिले आहे.




