देशभर लवकरच घरोघरी लसीकरण
Updated On:

नवी दिल्ली – देशात धनत्रयोदशीपासून घरोघरी जाऊन लस देण्याची मोहीम सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. केंद्र सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कालमर्यादा संपल्यानंतरही दहा कोटी लोक दुसरा डोस घेण्यास आले नाहीत. त्यांना लस देणे आवश्यक आहे. त्यामुळे घरोघरी जाऊन लस देण्याची मोहीम सुरू होईल.
त्यांच्या दाव्यानुसार, नोव्हेंबरमध्ये देशात एकूण 30 कोटी डोस उपलब्ध असतील, त्यामुळे रोज एक कोटी डोस दिले जाऊ शकतात. आधार डेटानुसार, सध्याच्या गतीनुसार वर्षअखेरपर्यंत 52.4% प्रौढांना दोन्ही डोस देणे शक्य आहे.





