US Open 2025 : आर्यना सबालेंकावर पैशांचा पाऊस! सलग दुसऱ्यांदा यूएस ओपन ट्रॉफीवर नाव कोरत रचला इतिहास

Aryna Sabalenka US Open 2025 Champion : बेलारूसची टेनिस स्टार आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेली आर्यना सबालेंकाने यूएस ओपन 2025 च्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकावत इतिहास रचला. तिने अंतिम सामन्यात अमेरिकेची अमांडा अनिसिमोव्हाचा 6-3, 7-6 (7/3) असा पराभव करत सलग दुसऱ्यांदा हा खिताब आपल्या नावावर केला.
विजेत्या आणि उपविजत्याला किती मिळाले बक्षीस –
या विजयासह सबालेंकाने आपली कारकीर्दीतील चौथे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवले आणि सेरेना विल्यम्स (2012-14) नंतर सलग दोनदा यूएस ओपन जिंकणारी पहिली महिला खेळाडू ठरली. या विजयाबरोबरच तिला 50 लाख अमेरिकन डॉलर्स ( सुमारे41 कोटी 75 लाखरुपये) एवढे प्रचंड पारितोषिकही मिळाले. त्याचबरोबर उपविजेता अमांडा 25 लाख अमेरिकन डॉलर्स ( सुमारे 20 कोटी 95 लाखरुपये) मिळाले.
सबालेंकाने आक्रमक आणि सातत्यपूर्ण खेळाने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध –
US Open: Aryna Sabalenka retains women’s singles title with thrilling win over Amanda Anisimova in NewYork.#Tennis🎾 #USOpen2025 #ArynaSabalenka pic.twitter.com/QgLpZCrhGb
— All India Radio News (@airnewsalerts) September 7, 2025
आर्थर अॅश स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात 27 वर्षीय सबालेंकाने आपल्या आक्रमक आणि सातत्यपूर्ण खेळाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. पहिल्या सेटमध्ये तिने अनिसिमोव्हाला 6-3 अशी मात देत सामन्यावर पकड मिळवली. दुसऱ्या सेटमध्ये अनिसिमोव्हाने तगडी लढत देत सामना टायब्रेकरपर्यंत नेला. मात्र, सबालेंकाने टायब्रेकरमध्ये 7-3 अशी बाजी मारत सामना खिशात घातला. तिच्या शक्तिशाली सर्व्हिस आणि बेसलाइनवरील खेळाने अनिसिमोव्हाला कुठेही संधी दिली नाही. या विजयाने तिने आपला दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला.
हेही वाचा – MS Dhoni : गोळ्यांच्या वर्षावासह एमएस धोनीचं चित्रपटात पदार्पण? ‘द चेज’चा रोमांचक टीझर रिलीज! पाहा VIDEO
तिसऱ्यांदा ग्रँडस्लॅमच्या अंतिम सामन्यात पोहोचली होती –
Sabalenka’s US Open dominance continues: Defending champion wins second straight title
Read @ANI Story l https://t.co/Jfl0s7osoS#ArynaSabalenka #USOpen #Tennis pic.twitter.com/YEmfRzQePi
— ANI Digital (@ani_digital) September 7, 2025
मागील वर्षी सबालेंकाने यूएस ओपनच्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्याच जेसिका पेगुलाला पराभूत केले होते. यंदा ती तिसऱ्यांदा ग्रँडस्लॅमच्या अंतिम सामन्यात पोहोचली होती, परंतु मागील दोन अंतिम सामन्यांत तिला पराभव पत्करावा लागला होता. अनिसिमोव्हाविरुद्धचा तिचा मागील रेकॉर्डही फारसा चांगला नव्हता, परंतु या सामन्यात तिने आपल्या खेळाचा दर्जा उंचावत खिताब जिंकला. तिच्या या यशाचे कौतुक करताना तज्ज्ञांनी तिच्या मानसिक आणि शारीरिक ताकदीचे विशेष कौतुक केले.
यूएस ओपनच्या विजेती म्हणून सबालेंकाला मिळालेले 50 लाख डॉलर्सचे पारितोषिक तिच्या यशाची ग्वाही देते. याशिवाय, या विजयाने तिचे जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान अधिक भक्कम झाले आहे. तिच्या या कामगिरीने आगामी हंगामातही ती ग्रँडस्लॅमवर वर्चस्व राखण्याची प्रबळ दावेदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सबालेंकाच्या या यशाने बेलारूसच्या टेनिस चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, तर तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर तिचे अभिनंदन करत जल्लोष साजरा केला.





