Hardik Pandya Watch : हार्दिकच्या घड्याळाच्या किंमतीसमोर पाकिस्तानी संघाचा वार्षिक पगार फिका! जाणून घ्या किती आहे किंमत?

Hardik Pandya Watch Price : आशिया कप 9 सप्टेंबर 2025 पासून सुरू होत आहे, पण त्यापूर्वीच भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्याचे घड्याळ चर्चेचा विषय ठरला आहे. हार्दिकने दुबईत सरावादरम्यान परिधान केलेली हे घड्याळ इतके महाग आहे की, आशिया कपसाठी निवडलेल्या पाकिस्तानच्या 17 खेळाडूंच्या एकत्रित वार्षिक पगारापेक्षा त्याची किंमत जास्त आहे. हे घड्याळ रिचर्ड मिल आरएम २७-०४ (Richard Mille RM 27-04) आहे, ज्याची बाजारातील किंमत तब्बल 20 कोटी रुपये आहे.
पाकिस्तानी खेळाडूंच्या पगाराचा आढावा –
आशिया कपसाठी निवडलेल्या पाकिस्तानच्या 17 खेळाडूंमध्ये सात खेळाडू ग्रेड बी मध्ये येतात. यामध्ये अबरार अहमद, फखर झमान, हारिस रौफ, हसन अली, सैम अयूब, सलमान आगा आणि शाहीन आफ्रिदी यांचा समावेश आहे. या प्रत्येक खेळाडूचा वार्षिक पगार भारतीय चलनात 1 कोटी, 69 लाख, 2 हजार 540 रुपये आहे. यानुसार या सात खेळाडूंच्या एकत्रित वार्षिक पगाराची रक्कम 11 कोटी, 83 लाख, 17 हजार, 780 रुपये होते.
करोड़ों की घड़ी पहनकर प्रैक्टिस करने पहुंचे हार्दिक पंड्या, इस घड़ी की कीमत, टूर्नामेंट जीतने वाली टीम को मिलने वाले प्राइज मनी (₹2.6 करोड़) से भी कई गुना ज़्यादा है।#HardikPandya #AsiaCup2025 #CricketBuzz #LuxuryWatch #20Crore #oihindi pic.twitter.com/4o8UFhnoPO
— Oneindia Hindi (@oneindiaHindi) September 7, 2025
ग्रेड सी आणि डी खेळाडूंचा पगार –
पाकिस्तानचे पाच खेळाडू ग्रेड सी मध्ये येतात, ज्यामध्ये फहीम अशरफ, हसन नवाज, मोहम्मद हैरिस, मोहम्मद नवाज आणि शाहिबजादा फरहान यांचा समावेश आहे. या प्रत्येक खेळाडूचा वार्षिक पगार 93 लाख, 90 हजार, 300 रुपये आहे. म्हणजेच या पाच खेळाडूंच्या एकूण पगाराची रक्कम 4 कोटी, 69 लाख, 51 हजार, 500 रुपये आहे. उर्वरित पाच खेळाडू ग्रेड डी मध्ये येतात, ज्यांना प्रत्येकी 56 लाख, 34 हजार, 180 रुपये वार्षिक पगार मिळतो. या पाच खेळाडूंच्या एकत्रित पगाराची रक्कम 2 कोटी, 81 लाख, 70 हजार, 900 रुपये आहे.
हेही वाचा – Hockey Asia Cup 2025 : भारताचा विजयरथ सुसाट; चीनचा धुव्वा उडवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री!
17 खेळाडूंचा पगारही घड्याळापेक्षा कमी –
आशिया कपसाठी निवडलेल्या पाकिस्तानच्या 17 खेळाडूंच्या एकूण वार्षिक पगाराची रक्कम जोडली, तर ती 19 कोटी, 34 लाख रुपये होते. ही रक्कम हार्दिक पंड्याच्या 20 कोटी रुपये किंमतीच्या Richard Mille RM 27-04 घड्याळापेक्षा कमी आहे. दुबईत सरावादरम्यान हार्दिकने ही घड्याळ परिधान केल्याने सर्वांचे लक्ष त्याच्याकडे गेले. आशिया कपच्या मैदानावरील लढतीपूर्वीच हार्दिकच्या या घड्याळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.





